Download App

सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं स्वातंत्र्यावर मोठं विधान; चोखामेळ्याचा उल्लेख करत बांगलादेशाचा दिला दाखला

बांगलादेशाची आजची स्थिती पाहून भारतातील स्वातंत्र्याची किंमत कळते असं म्हणत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी महत्वाचं भाष्य केलं.

  • Written By: Last Updated:

DY Chandrachud : दिल्लीमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत असताना (Chandrachud) देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी स्वातंत्र्याविषयी एक महत्वाचं विधान केलं आहे. बांगलादेशामध्ये आज जे होतंय ते पाहून स्वातंत्र्याची किंमत काय असते हे लक्षात येतंय असं विधान त्यांनी केलं आहे.

तैवान भूकंपाने हादरलं; राजधानी तैपेईमध्ये अनेक इमारतींना बसला धक्का, 6.3 भूकंपाची तीव्रता

देश सोडून जावं लागलं

स्वातंत्र्याचा हा दिवस संविधानाची मूल्य जोपासण्याचा आणि देशाप्रती आपल्या कर्तव्याची जाणीव करुन देणारा आहे. भारताने १९५०च्या स्वातंत्र्याचा पर्याय निवडला आहे. आज बांगलादेशात जे होतंय त्यावरुन स्वातंत्र्याची किंमत आपल्या लक्षात येतेय. सध्या बांगलादेश खडतर परिस्थितीतून जात आहे. भारताच्या या शेजारील देशामध्ये अशांती आहे. देशात आरक्षणाच्या विरोधात हिंसा भडकली. जूनमध्ये याची सुरुवात झाली होती आणि ऑगस्टमध्ये या मुद्द्याने जोर धरला. लोकांच्या रोषापुढे पंतप्रधान शेख हसीना यांना झुकावं लागलं. त्यांना देश सोडून जावं लागलं असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

परंपरेचा उल्लेख

आपलं जीवन संपन्न बनवण्यासाठी ज्या लोकांनी कष्ट घेतले आहे, त्यांना मी अभिवादन करतो. आपल्या देशाने खूपकाही भोगलं आहे. स्वातंत्र्याचा विचार देणारे अनेक थोर लोक आपल्याकडे होऊन गेले. आज सकाळीच मी प्रसिद्ध कर्नाटकी गायिका चित्रा कृष्ण यांनी लिहिलेली सुंदर रचना वाचत होतो. या कवितेचं शीर्षक स्वतंत्रता गीत असं आहे. यावेळी सरन्यायाधीशांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरु, कृष्णास्वामी अय्यर, गोविंद वल्लभ पंत, देवी प्रसाद खेतान, सर सय्यद मोहम्मद सादुल्ला, चोखामेळा यांचाही उल्लेख करुन देशाच्या समृद्ध परंपरेचा उल्लेख केला.

Sonu Sood: 78वा स्वातंत्र्यदिन ‘फतेह’ अभिनेत्याने अमेरिकेत राष्ट्रध्वज फडकवला

चोखामेळा

चौदाव्या शतकात महाराष्ट्रात चोखामेळा यांनी ईश्वराच्या ओढीने भजनं लिहिली. मंदिराबाहेर उभं राहून भजनं गाऊन ते देवाचा धावा करायचे. मला देवाला भेटू द्या, अशी विनवणी करायचे..अबीर गुलाल उधळीत रंग हे भजन त्यांनी साकारलं. कबीरांनीही भजनांमधून संदेश दिला. रवींद्रनाथ टागोरांनी तर महान साहित्यकृती देशाला अर्पण केल्याचं म्हणत चंद्रचूड यांनी चोखामेळ्याची आठवण यावेळी केली.

follow us