Download App

शरद पवारांनी आदेश दिला तर पाकिस्तानातूनही निवडणूक लढवेन, सूर्यकांता पाटील विधानसभेच्या रिंगणात

शरद पवार यांनी आदेश दिल्यास मी पाकिस्तानातूनही विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे, असं सूर्यकांता पाटील म्हणाल्या.

  • Written By: Last Updated:

Suryakanta Patil :  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. राजकीय नेते मंडळी देखील आपल्याच तिकीट मिळावं, यासाठी प्रयत्नशील आहेत. अशातच भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनाही विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी आदेश दिल्यास मी पाकिस्तानातूनही निवडणूक लढवण्यास तयार आहे, असं सूर्यकांता पाटील यांनी सांगितले.

लोकसभेला हिसका दाखवल्याने सरकार हादरलं; जयंत पाटलांनी जखमेवर मीठ चोळलं 

अजितदादांनी माझा कारखाना विकला…
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नांदेडमध्ये शरदचंद्र पवार पक्षाची बैठक झाली. यावेळी सूर्यकांता पाटील यांचीही उपस्थिती होती. शरद पवार गटात आल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आली. मात्र, या सत्कार समारंभात सूर्यकांत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासह अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. या दोघंना मिळून माझा कारखाना देखील विकल्याचा आरोप सूर्यकांता पाटील यांनी केला आहे.

Uddhav Thackeray : महाविकास आघाडीचं ठरलं, उद्धव ठाकरे हेच प्रचारप्रमुख? 

सूर्यकांता पाटील म्हणाल्या की, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेने माझ्या सहकारी साखर कारखान्याला कर्ज दिलं होतं. मात्र ते परत कऱण्याच्या दृष्टीकोनातून अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांनी कारखान्याची जमीन विकली. त्या माध्यमातून बॅंकेसोबत सेटलमेंट करण्याऐवजी ते पैसे खर्च करून त्याचे खापर माझ्या माथी फोडले. त्यामुळं आता बँकेचे कर्ज भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, असे सूर्यकांता पाटील म्हणाल्या.

शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर सूर्यकांता पाटील चांगल्याच सक्रीय झाल्या. त्यामुळे त्या विधानसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरही त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. शरद पवार यांनी आदेश दिल्यास मी पाकिस्तानातूनही विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे, असं सूर्यकांता पाटील म्हणाल्या.

दरम्यान, सूर्यकांता पाटील या गेली दहा वर्षे भाजपमध्ये होते. मात्र, आता त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगल्याच सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळं पक्ष त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us