लोकसभेला हिसका दाखवल्याने सरकार हादरलं; जयंत पाटलांनी जखमेवर मीठ चोळलं

लोकसभेला हिसका दाखवल्याने सरकार हादरलं; जयंत पाटलांनी जखमेवर मीठ चोळलं

Jayant Patil : राज्यातील जनतेने लोकसभेला हिसका दाखवल्याने सरकार हादरलं, असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सत्ताधाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज बीडमध्ये पार पडली. या सभेत जयंत पाटील बोलत होते.

Bigg Boss Marathi : सूरजला समजावण्याचा DP चा तिखट कोल्हापुरी अंदाज पाहिलात का?

जयंत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जनतेने सरकारला हिसका दाखवल्याने सरकार हादरलंय. बीड लोकसभा मतदारसंघात संघर्षाची लढाई झाली असून इथल्या जनतेचे आम्हाला कौतूक आहे. महाविकास आघाडीकडून बजरंग सोनावणेसारखा उमेदवार होता म्हणून तो शेवटपर्यंत तग धरुन होता. विरोधकांकडून सोनावणे डमी उमेदवार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र जनतेने छातीचा कोट करुन शेवटपर्यंत आपली जागा लढवली, त्याबद्दल बीडच्या जनतेचे अभिनंदन, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

वैद्यकिय महाविद्यालयांत 75 हजार जागा निर्माण करणार; PM मोदींची मोठी घोषणा

तसेच बीड जिल्ह्यातील अनेक भागांत पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. या जिल्ह्यात पाण्याचं दुर्भीक्षच आहे. इथले ऊसतोड कामगार लांब लांब जात असतात. अद्याप इथल्या काही भागांत पाण्याची सोय नाही. भारताने चंद्रावर चांद्रयान-3 मोहिम राबवून चंद्रावर यान पाठवलं आहे. त्यासाठी 600 कोटी रुपये खर्च करण्यात आलायं, मात्र, अलीबागवरुन विरारला जाण्यासाठी करण्यात येत असलेल्या रस्त्याच्या कामासाठी 26 हजार कोटी रुपये खर्च करण्याची सरकारची इच्छा आहे. महाराष्ट्र कसा लुटला जातोयं पाहा, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केलीयं.

फडणवीसांनी मराठा, धनगर संपवला, त्यांना संपवा-संपवी खात्याचं मंत्री करा…; जरांगेंचे टीकास्त्र

सरकारकडून अऩेक योजना जाहीर करण्यात आल्या आहे. त्यासाठी शिंदे सरकारकडून जाहिरातींसाठी 280 कोटी रुपये खर्च करीत आहेत. वर्तमानपत्रातील चार ते पाच पानांवर शिंदे-फडणवीस सरकारच्या जाहीराती पाहायला मिळत आहेत. टिव्ही, मोबाईलमध्येही या सरकारकडून जाहीरातबाजी करण्यात येत आहे. या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचेच फोटो दिसत असल्याची टीका जयंत पाटलांकडून करण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube