वैद्यकिय महाविद्यालयांत 75 हजार जागा निर्माण करणार; PM मोदींची मोठी घोषणा

वैद्यकिय महाविद्यालयांत 75 हजार जागा निर्माण करणार; PM मोदींची मोठी घोषणा

PM Narendra Modi Independence Day Speech 2024 : आज देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना संबोधित केले. मोदी म्हणाले, देशातील नागरिकांसाठी आम्ही दीड हजारांपेक्षा जास्त कायदे रद्द केले. यामुळे लोकांचे जीवन अधिक सुसह्य झाले. किरकोळ गोष्टींसाठी सुद्धा कारावासाची शिक्षा असणारे कायदे रद्द करण्यात आले. अपराधिक कायदे बदलण्यात आले. यावेळी मोदींनी एक मोठी घोषणा केली. पुढील पाच वर्षांच्या काळात वैद्यकिय महाविद्यालयांत आणखी 75 हजार नवीन जागा निर्माण करणार असल्याचे मोदी म्हणाले.

78 वा स्वातंत्र्यदिन; राजधानी दिल्लीत कडकोट सुरक्षा, PM मोदींच्या सुरक्षेसाठी 10 हजार कमांडो 

मागील दहा वर्षांच्या काळात देशात रस्ते, रेल्वे, महामार्ग, स्कूल कॉलेज, रुग्णालये, मेडिकल कॉलेज, अमृत सरोवर, दोन लाख ग्रामपंचायतीत ऑप्टिकल फायबर, चार कोटी पक्की घरे अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या. आज येथे अनेक युवा खेळाडू उपस्थित आहेत ज्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव मोठं केलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. आगामी काळात भारताचे एक पथक पॅरिसला जाणार आहे. जी 20 परिषदेचे आयोजन भारतात झाले. अनेक शहरांत दोनशे पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आता आमचं स्वप्न आहे की 2036 मध्ये ऑलम्पक स्पर्धा भारतात व्हाव्यात. यासाठी तयारीस सुरूवात करण्यात आली आहे.

याआधी संरक्षण बजेटमधील पैसे बाहेरून हत्यारे खरेदी करण्यातच संपून जात होते. आज मात्र आम्ही देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवले आहे. संरक्षण उपकरणांच्या निर्मितीत भारताची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भारत डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखला जाऊ लागल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

महिला आधारीत विकासाच्या मॉडेलवर काम करण्यात आले आहे. इनोवेशन पासून प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे येत आहेत. महिला फक्त सहभागीच होत नाहीत तर नेतृत्वही करत आहेत. सेना, नौसेना आणि स्पेस क्षेत्रात महिलांनी स्वतःला सिद्ध केले आहे. सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. आगामी काळात आणखीही योजना राबविण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

Modi 3.0 : PM मोदींचे मंत्रिमंडळ किती शिकलेले? जाणून घ्या, प्रत्येक मंत्र्याची शैक्षणिक पार्श्वभूमी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube