बारामतीच्या रिंगणात जय पवार? अजितदादा म्हणाले, ७-८ वेळा लढलो, आता इंटरेस्ट नाही

बारामतीच्या रिंगणात जय पवार? अजितदादा म्हणाले, ७-८ वेळा लढलो, आता इंटरेस्ट नाही

Ajit Pawar Pune : राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. सत्ताधारी महायुतीकडून या निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. यातच आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कुटुंबातील चौथा सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याचे संकेत मिळाले आहेत. खुद्द अजित पवार यांनीच या बातमीला दुजोरा दिला आहे. बारामती विधानसभा  (Ajit Pawar) निवडणुकीत जय पवार यांना संधी देणार का असा प्रश्न माध्यमांनी विचारल्यानंतर अजित पवार यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

Sanjay Raut: बारामतीतून लाडक्या बहिणी अजित पवारांना पराभूत करतील; संजय राऊतांचा घणाघात

अजित पवार यांनी आज पुण्यात शासकीय ध्वजारोहणानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुत्र जय पवार यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले. पत्रकारांनी जय पवार यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, उमेदवारी द्यायला पाहिजे किंवा नाही याबाबत जनतेचा आणि त्या भागातील काही कार्यकर्ते मागणी करतील ते करायला तयार आहे. मी सात ते आठ वेळा निवडणूक लढलो आहे. त्यामुळे मला त्यात इंटरेस्ट नाही. शेवटी पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल की कोणाला उमेदवारी द्यायला पाहिजे. त्यानुसार निर्णय घेतला जाईल.

पत्रकारांनी नेमकं काय विचारलं?

बारामती विधानसभेत तरुण चेहरा किंवा युवा उमेदवार म्हणून जय पवार यांना संधी मिळेल का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर अजित पवार म्हणाले, ठीक आहे देऊ या, शेवटी लोकशाही आहे, मला तर त्यात काही इंटरेस्ट नाही. मी सात ते आठ वेळा निवडणूक लढलो आहे.

मतभेदाच्या बातम्या धादांत खोट्या

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात मतभेद आहेत अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या. यावर विचारले असता अजित पवार म्हणाले, याबाबतीत ज्या काही बातम्या येत आहेत त्या धादांत खोट्या बातम्या आहेत. आमच्यात कुठलाही वाद नाही, मतभेद नाहीत. आम्ही सगळे एकोप्याने महायुती सरकार चालवत आहोत. आम्ही सगळे एकत्रित काम करत आहोत. विरोधकांना दुसरा मुद्दा राहिला नाही. असं कुणी काही करत असेल तर माझा नाईलाज आहे मला त्यावर बोलायचं नाही.

हौसे-नवशे-गवश्यांना भुलू नका माझा वादा पक्का असतो; अजितदादांचं भर पावसात बारामतीकरांना आवाहन

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube