फडणवीसांनी मराठा, धनगर संपवला, त्यांना संपवा-संपवी खात्याचं मंत्री करा…; जरांगेंचे टीकास्त्र

फडणवीसांनी मराठा, धनगर संपवला, त्यांना संपवा-संपवी खात्याचं मंत्री करा…; जरांगेंचे टीकास्त्र

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी अनेकदा सरकारविरोधात आंदोलन केलं. मात्र, अद्यापही आरक्षणावर तोडगा निघाला नाही. त्यामुळं ते सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका करत आहेत. आताही त्यांनी फडणवीसांवर टीकास्त्र डागलं.

बेरोजगार राहू पण… Cognizant ने ऑफर केलेल्या अडीच लाखांच्या पॅकेजवर फ्रेशर्सचा संताप 

राज्यात एक संपवा-संपवीचं खातं निघालं पाहिजे. ते खाते फडणवीसांकडे दिलं पाहिजे. कारण, फडणवीसांनी मराठा, मुस्लिम, धनगर संपवला, असा आरोप जरांगेंनी केला.

जरांगे-पाटील यांनी बुधवारी अंतरवली सराटीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून माझ्या कोणत्याही अपेक्षा नाहीत. कारण द्यायचं नाही, असं त्यांचं ठरलं आहे. सरकारला मराठा आणि ओबीसी समाजात भांडणं लावायची आहेत, त्यांना दंगलीड घडवायच्या आहेत. सरकारने सरळसरळ फसवा-फसवी केली, अशी टीका जरांगेंनी केली.

BCCI कडून मोठी घोषणा, ‘या’ दिग्गज खेळाडूची टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड 

पुढं ते म्हणाले, राज्यात एक संपवा-संपवी खातं निघालं पाहिजे. ते खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलं पाहिजे. कारण, फडणवीसांनी मराठा, मुस्लिम, धनगर संपवला. त्यासह मोठ्या जाती संपवण्याचं कामही त्यांनी केलं. पाच वर्षे काम केलं नाही. फक्त फोडोफोडी त्यांनी केली, अशी टीका जरांगेंनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षण देतील, पण फडणवीस आरक्षण देऊ देत नाहीत, असंही जरांगे म्हणाले.

तर सत्ता मिळतच नसते
फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी रॅली काढावी. सत्ता मिळविण्यासाठी काढू नये. कारण आरक्षण दिलं नाही तर सत्ता मिळतच नसते. मराठा आणि धनगर समाज राज्यात मोठे आहेत. या दोन समाजाला संपवण्याचं काम फडणवीसांनी केलं, असा आरोपही जरांगेंनी केला.

सगळे माजी-आजी मुख्यमंत्री विरोधात
सगळे माजी आणि आजी मुख्यमंत्री माझ्या विरोधात उतरले आहेत. अशोक चव्हाण, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे सर्व माझ्या विरोधात आहेत. शिवाय सर्व उपमुख्यमंत्रीही माझ्या विरोधात आहेत. माझा असा अंदाज आहे की, फडणवीस जाणीवपूर्वक आरक्षण मिळून देत नाहीत, असा दावाही जरांगेंनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube