सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे गेल्या काही महिन्यापासून कायम चर्चेत असतात. आपल्या रोखठोक सवाल आणि भूमिकांमुळे ते सतत चर्चेत येतात. सोशल मीडियावर देखील त्यांची अनेक वक्तव्ये व्हायरल होत असतात. त्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे
काही महिण्यापूर्वी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आपल्या दोन्ही मुलींना घेऊन थेट सर्वोच्च न्यायालयात आले. चंद्रचूड यांच्या दोन्ही दिव्यांग मुलींनी वडिलांचं कामाचं ठिकाण पाहण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर त्यांनी मुलींना आपलं कामाचं ठिकाण दाखवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात आणलं होत. त्यांच्या या कृतीचे अनेक लोकांनी कौतुक केलं होत.
Prakash Ambedkar ; आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही
यावेळी धनंजय चंद्रचूड यांनी मुलींना त्यांच्या कामाची माहिती देत चेंबर दाखवले. तसेच न्यायमूर्ती कोठे बसतात आणि वकील कोठे उभे राहून युक्तीवाद करतात हेही सांगितलं.
धनंजय चंद्रचूड यांच्या दोन्ही मुली या दिव्यांग आहेत. त्यातील एका मुलीला जन्मजात सेरेब्रल पाल्सी आहे, तर दुसऱ्या मुलीला आॅटिझम हा दुर्मिळ आजार आहे. चंद्रचूड यांनी आपल्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर कल्पना दास यांच्यासोबतच्या दुसऱ्या लग्नानंतर त्यांनी या दोन्ही मुलींना दत्तक घेतले आहे.