टोल प्लाझा, UPI पेमेंट आणि एक छोटी चूक अन् पोलिस पोहोचले सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ रथ यांच्या मारेकऱ्यांपर्यंत

Suvendu Adhikari's PA Chandranath Rath च्या हत्येप्रकरणी संशयितांपर्यंत पोहोचण्यामागे UPI व्यवहार आणि टोल प्लाझावरील CCTV फुटेज महत्त्वाचे ठरले आहे.

Suvendu Adhikari's PA Chandranath Rath

Suvendu Adhikari's PA Chandranath Rath

Toll plaza, UPI payment and a small mistake and the police reached the killers of Suvendu Adhikari’s PA Chandranath Rath : सुवेंदू अधिकारी यांच्या निकटवर्तीय सहकारी चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये मोठा खुलासा झाला आहे. हा केवळ एक खून नसून, संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारा हाय-प्रोफाइल गुन्हा ठरला आहे. तपास यंत्रणांनी या प्रकरणात तीन संशयितांना अटक केली असून, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यामागे एक साधा UPI व्यवहार आणि टोल प्लाझावरील CCTV फुटेज महत्त्वाचे ठरले आहे.

काय घडलं त्या रात्री?

6 मेच्या रात्री, 24 उत्तर परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम परिसरात चंद्रनाथ रथ यांची कार काही अज्ञात हल्लेखोरांनी अडवली. त्यानंतर त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध असल्याचं तपासातून समोर आलं आहे. सुरुवातीला पोलिसांकडे ठोस पुरावे नव्हते. पण तांत्रिक तपास आणि चौकशीच्या आधारे एकेक धागा उलगडत गेला. हत्येनंतर आरोपी एका कारमधून पळून जात होते. ही कार बाली टोल प्लझा मधून गेली. इथे त्यांनी टोल भरताना UPI चा वापर केला. हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. UPI पेमेंटमधून मिळालेल्या मोबाईल नंबरचा मागोवा घेत पोलिसांनी आरोपींच्या हालचाली शोधल्या. तपास अधिकाऱ्यांनी त्या नंबरच्या आधारे बिहार आणि उत्तर प्रदेशपर्यंत साखळी उलगडली.

बिहार-उत्तर प्रदेशमधून तिघांना अटक

पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष पथकाने बिहारमधील बक्सर येथून मयंक राज मिश्रा आणि विक्की मौर्य यांना ताब्यात घेतले. तर तिसरा आरोपी राज सिंह याला बालिया येथून पकडण्यात आले. CID अधिकाऱ्यांनी तिघांची कसून चौकशी केली. पोलिसांच्या मते, हे तिघे बाहेरून बोलावलेले व्यावसायिक शूटर होते. म्हणजेच, हत्या ‘सुपारी’ देऊन करवून घेतली गेल्याची शक्यता अधिक मजबूत झाली आहे.

CCTV फुटेजमधून उघड झाला कारचा प्लॅन

टोल प्लाझावरील हाय-डेफिनिशन कॅमेऱ्यांमध्ये आरोपींची कार स्पष्ट दिसली. तपासात आढळलं की हल्ल्यासाठी वापरलेली सिल्वर रंगाची हॅचबॅक कार ‘क्लोन व्हेईकल’ होती म्हणजेच, मूळ गाडीची नक्कल करून बनवलेली आणि त्यावर बनावट नंबर प्लेट लावण्यात आली होती. ही नंबर प्लेट सिलिगुरी येथील एका खऱ्या वाहनाच्या नंबरशी जुळत होती. आरोपींनी ऑनलाइन विक्री पोर्टलवरून कारचे फोटो मिळवले आणि त्यावरून नकली नंबर प्लेट तयार केली होती. ही अत्यंत चलाखीची युक्ती होती. मात्र UPI पेमेंटमुळे संपूर्ण योजना कोसळली.

हत्येमागचा मास्टरमाइंड कोण?

सध्या पश्चिम बंगाल CID च्या अनेक टीम्स बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये तळ ठोकून आहेत. तपास यंत्रणा आता या हत्येची सुपारी कोणी दिली, याचा शोध घेत आहेत. पोलिसांना संशय आहे की शूटर बाहेरून आले असले तरी संपूर्ण कट रचण्यात स्थानिक लोकांचाही सहभाग असू शकतो. म्हणजेच, स्थानिक स्तरावरून मदत मिळाल्याशिवाय एवढा नियोजनबद्ध हल्ला शक्य नव्हता.

आधुनिक विदेशी पिस्तूलमुळे वाढली चिंता

इंनडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, या हत्येत ग्लॉक 47X या ऑस्ट्रियामध्ये बनवलेल्या आधुनिक पिस्तुलाचा वापर करण्यात आला. हे शस्त्र सामान्य गुन्हेगारांकडे आढळत नाही. अशा प्रकारची अत्याधुनिक बंदूक सहसा संघटित गुन्हेगारी टोळ्या किंवा व्यावसायिक गँगकडे असते. त्यामुळे राज्य आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांची चिंता वाढली आहे.

तपास अजूनही सुरू

सध्या तिन्ही आरोपी पोलिस कोठडीत असून त्यांची सतत चौकशी सुरू आहे. CID च्या मते, या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता आहे. चंद्रनाथ रथ हत्याकांड आता फक्त एक खून प्रकरण राहिलेलं नाही. ते एका आंतरराज्यीय गुन्हेगारी जाळ्याच्या तपासात बदललं आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version