Download App

महागाईचा भडका! टोमॅटो, तूर दाळींचे दर वाढले, स्वस्त कर्जाचं स्वप्नही भंगले

भारतीय अर्थव्यवस्थेत मान्सूनला (monsoon) खूप महत्त्व आहे. मान्सूनचे आगमन उशीरा झाल्यास किंवा पुरेसा पाऊस झाला नाहीतर त्याचे गंभीर परिणाम अर्थव्यवस्थेवर होतांना दिसतात. परिणामी महागाई (inflation) वाढते. आताही वाढत्या महागाईने सर्वसामान्यांना मोठा झटका बसला. किरकोळ महागाईचा दर जुलै महिन्यात चांगलाच वाढला. महागाईने डोकं वर काढल्यानं सामान्य माणूस मेटाकुटीला आहे. खरंतर मे महिन्याच्या किरकोळ महागाईचे आकडे जाहीर झाले आणि हा आकडा 4.25 टक्क्यांपर्यंत खाली आला, तेव्हा महागड्या EMI मधून लवकरच दिलासा मिळेल अशी आशा सर्वांना वाटू लागली. मात्र गेल्या काही दिवसांत टोमॅटो व तूर डाळीच्या दरात ज्याप्रकारे मोठी उसळी पाहायला मिळत आहे, त्यानंतर महागड्या कर्जातून दिलासा मिळण्याच्या आशेवर पाणी फेरल्या गेल्याचं दिसतं. (Tomato Tur Dal rate increase cheap loans have been shattered)

ऑगस्टमध्ये आरबीआय एमपीसीची बैठक

8 ते 10 ऑगस्ट दरम्यान RBI च्या चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. आणि 10 ऑगस्ट रोजी आरबीआय गव्हर्नर समितीच्या बैठकीतील ध्येय धोरण जाहीर करतील. सध्या पालेभाज्या, भाजीपाला आणि डाळींच्या महागाईत वाढ झाली आहे, त्यामुळं आता ऑगस्ट महिन्यात महागड्या कर्जातून काही दिलासा मिळेल अशी आशा फार कमी आहे.

Ajit Agarkar; मराठमोळा अजित आगरकर निवड समितीचा अध्यक्ष, बीसीसीआयची घोषणा 

टोमॅटोच्या दरात वाढ

जून महिन्यापासून खाद्यपदार्थांमध्ये पुन्हा तेजी दिसून येते. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या किंमत निरीक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, तुर डाळीची सरासरी किंमत 1 जून 2023 रोजी प्रति किलो 122.08 रुपये होती, ती 4 जुलै रोजी 131.1 रुपये प्रति किलो झाली आहे. अवघ्या एका महिन्यात किमतीत 7.40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर 4 जुलै रोजी टोमॅटोचा सरासरी भाव 25.44 रुपये किलो होता, तो आता 83.29 रुपये किलो इतका झाला आहे.

तांदूळ-साखर, कांदा, दुधाच्या दरातही वाढ

महागाई केवळ तुर डाळ आणि टोमॅटोपुरती मर्यादित नाही. 1 जून रोजी तांदळाची सरासरी किंमत 39.28 रुपये प्रति किलो होती, ती 4 जुलै रोजी 40.26 रुपये प्रति किलो झाली आहे. म्हणजे तुर डाळीच्या किमतीत 2.50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. साखर 42.43 रुपये किलोने उपलब्ध होती, आता 43.04 रुपये किलोने उपलब्ध आहे. 1 जून रोजी कांद्याचा सरासरी भाव 22.31 रुपये किलो होता, तो 4 जुलै रोजी 25.33 रुपये किलो झाला आहे. एवढेच नाही तर या काळात मैदा, उडीद डाळ आणि दुधाचे भावही वाढले आहेत.

Tags

follow us