Railway Train : महिलेच्या अंगावर टीटीने केली लघवी! प्लेननंतर रेल्वेतही धक्कादायक प्रकार!

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या (Air India Flight) फ्लाईटमध्ये नशेत लगवीकांड (Uriene Case) घडल्याची घटना समोर आली होती. आता रेल्वेतही  (Railway Train) असाच प्रकार समोर आला आहे. रेल्वेच्या टीटीने (TT) एका महिलेच्या अंगावर दारूच्या नशेत लगवी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंजाब राज्यातील अमृतसर येथील एक दाम्पत्य प्रवास करत असताना या महिलेच्या […]

Indian Railways

Indian Railways

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या (Air India Flight) फ्लाईटमध्ये नशेत लगवीकांड (Uriene Case) घडल्याची घटना समोर आली होती. आता रेल्वेतही  (Railway Train) असाच प्रकार समोर आला आहे. रेल्वेच्या टीटीने (TT) एका महिलेच्या अंगावर दारूच्या नशेत लगवी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंजाब राज्यातील अमृतसर येथील एक दाम्पत्य प्रवास करत असताना या महिलेच्या अंगावर टीटीने लगवी केल्याची घटना घडली आहे. या वर्षातील ही दुसरी धक्कादायक घटना आहे.

अकाली तख्त या अमृतसर ते कोलकत्ता या ट्रेनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. टीटीने महिलेच्या डोक्यावर लगवी केली. त्यावेळी महिलेने आरडाओरडा केल्यावर महिलेचा पती आणि आजूबाजूच्या प्रवाशांनी टीटीला पकडला आणि रेल्वे पोलिसांच्या ताब्यात या टीटीला दिले आहे.

गद्दार सत्तार हाय हाय… विधानभवनाच्या पायर्‍यांवर विरोधकांची घोषणाबाजी

दरम्यान, याबाबत रेल्वे पोलिसांनी सांगितले की, अमृतसर येथील के. राजेश हे आपल्या पत्नीबरोबर अकाली तख्त एक्स्प्रेस या ट्रेनमधून प्रवास करत होते. ए-१ कोचमध्ये त्यांचे आरक्षण होते. रात्री १२ वाजता राजेश यांची पत्नी त्यांच्या सीटवर झोपलेली असताना बिहारचे टीटी मुन्ना कुमार यांनी दारूच्या नशेत त्यांच्या डोक्यावर लगवी केली. राजेश यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्यावर राजेश आणि इतर प्रवाशांनी या टीटीला पकडून जोरदार धुलाई केली. रेल्वे पोलिसांच्या ताब्यात या टीटीला दिली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

Exit mobile version