Download App

शेअर बाजारात जबरदस्त रिकव्हरी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी घोडदौड

Share Bazar : सकाळी शेअर बाजाराची (Share Market)सुरुवात मोठ्या घसरणीनं झाली पण दिवसभरातील ट्रेडिंग सत्रात सर्वांगीण रिकव्हरी झाल्याचे पाहायला मिळाली. भारतीय शेअर बाजाराचा सकाळचा रंग दुपारी बदलल्याचा पाहायला मिळाला. सकाळी शेअर बाजार ओपनींगच्या वेळी संपूर्णपणे लालेलाल दिसणारा बाजार बंद होताना मात्र हिरवा झाल्याचा पाहायला मिळाला. शेअर बाजारात जबरदस्त रिकव्हरी दिसून आली आणि बाजारातील व्यवहार तेजीसह बंद झाले.

किंग खानने ‘वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024’च्या परिषदेत हॉलीवूडच्या कामाबद्दल थेटच सांगितलं, म्हणाला…

शेअर बाजार बंद होताना BSE सेन्सेक्स 277.98 अंकांच्या आणि 0.39 टक्क्यांच्या वाढीसह 71 हजार 833 च्या पातळीवर बंद झाला. त्याचवेळी, NSE चा निफ्टी 96.80 अंकांनी आणि 0.45 टक्क्यांच्या वाढीसह 21 हजार 840 च्या पातळीवर बंद झाला.

पार्थ पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेवर रोहित पवारांचे टीकास्त्र; म्हणाले, ‘विचारवंत राज्यसभेवर….’

मार्केट निफ्टी 21 हजार 500 च्या वर बंद होण्यात यशस्वी झाला आहे. याचा अर्थ NSE त्याच्या सपोर्ट झोनच्या मदतीने तेजीच्या झोनमध्ये आहे. निफ्टीने खालच्या स्तरावरुन सुमारे 300 अंकांची उत्कृष्ट रिकव्हरी दाखवली आहे. सकाळी तो 200 अंकांपर्यंत खाली पोहोचला होता आणि बाजार बंद होताना तो 97 अंकांनी वाढल्याचा पाहायला मिळाला.

आज बँक निफ्टीने खालच्या स्तरावरुन जवळपास 1000 अंकांची झेप घेतली. सकाळी त्याने 45 हजारांची महत्त्वाची पातळी तोडली होती आणि 600 अंक गमावले होते, पण त्यानंतर बंद होईपर्यंत त्यात 400 अंकांची उसळी दिसून आली आणि तो 46 हजाराच्या पातळीवर बंद झाला.

निफ्टी पीएसयू बँक (Nifty PSU Bank)निर्देशांकात मजबूत वाढ दिसून आली आहे. ती 3.24 टक्क्यांच्या जबरदस्त वाढीसह बंद झाली. या निर्देशांकात इंडियन बँक 6 टक्क्यांच्या वाढीसह आणि SBI ही 4 टक्क्यांहून अधिकच्या वाढीसह बंद झाली.

एनएसई निफ्टीमध्ये BPCL च्या शेअर्सनी 7.30 टक्क्यांची तगडी वाढ नोंदवली. ONGC मध्ये 3.72 टक्के, कोल इंडियामध्ये 3.33 टक्के आणि टाटा स्टीलमध्ये 2.61 टक्के वाढीसह ट्रेड बंद झाला.

follow us