विल्लुपुरम : तामिळनाडूच्या रस्त्यावर घडलेल्या नाट्यमय घडामोडीची देशभराच चांगलीच चर्चा होतं आहे. त्याचं झालं असं की, बुधवारी चेन्नई पोलिसांना एक ट्रक रस्त्यात बंद पडल्याचा फोन आला. या ट्रकला तातडीने सुरक्षेची गरज असल्याचं समोरुन सांगण्यात आलं. कारण ट्रकमध्ये होते तब्बल 1070 कोटी रुपये. हा फोन ऐकताच पोलिसांना सुरुवातीला चांगलाच घाम फुटला. यानंतर कशीतरी धावपळ करत चेन्नई आणि विल्लुपुरममधून डझनभर अधिकाऱ्यांसह 150 पोलीस कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले अन् टोईंग वाहनाच्या साह्याय्याने ट्रक सुरक्षित ठिकाणी नेण्यात आला. (The truck carrying Rs 1070 crore got stuck on the road and the police were also rushed.)
खराब ट्रकमध्ये होते 550 कोटी :
बुधवारी दुपारी चेन्नईच्या रिझर्व्ह बँकच्या कार्यालयातून 1070 कोटी रुपये घेऊन दोन ट्रक विल्लपुरम आणि तांबरमसाठी रवाना झाले. हे पैसे इथल्या बँकामध्ये पोहचवाचे होते. पण विल्लुपुरमच्या रस्त्यावर एक ट्रकचे इंजिन बंद पडले. त्यामुळे दोन्ही ट्रक भर रस्त्याच थांबले. ट्रक थांबताच त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. खराब झालेल्या ट्रकमध्ये तब्बल 550 कोटी होते. तर दुसऱ्या ट्रकमध्ये तब्बल 520 कोटी रुपये होते.
रिकव्हरी व्हेईकलने ट्रक आरबीआयकडे परत पाठवला :
यानंतर सुमारे 100 पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ट्रकला रिकव्हरी वाहनाने जवळच्या सुरक्षित कंपाउंडमध्ये नेले. मेकॅनिकला बोलावून खराब झालेला ट्रक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ट्रक दुरुस्त झाला नाही. यानंतर, दोन्ही ट्रक रिकव्हरी वाहनांनी टोइंग केले आणि आरबीआयकडे परत पाठवले.
नोटांनी भरलेले ट्रक पाहायला बघ्यांची गर्दी :
महामार्गावर ट्रक खराब होणे ही मोठी समस्या नाही. मात्र, शेकडो पोलिस ट्रकला घेरलेले पाहून परिसरातही एकच खळबळ उडाली. दोन्ही ट्रकमध्ये हजारो कोटी रुपये भरल्याची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी होऊ लागली. महामार्गावर बघ्यांची गर्दी वाढल्याने पोलिसांनी लोकांना समजावून सांगत परत पाठवून दिले.