Share Market : भारतीय शेअर बाजारात (Share Market )आज मंगळवारी (दि.23) मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाली. अक्षरशः आजचा दिवस शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरल्याची भावना गुंतवणुकदारांकडून(Investors) बोलली जात आहे. नफेखोरीचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 1053 अंकांनी घसरुन 70 हजार 300 च्या खाली आली. तर निफ्टी (Nifty)330 अंकांनी घसरुन 21,300 पर्यंत खाली आला आहे.
शेअर बाजारात अचानक आलेल्या त्सुनामीमुळे गुंतवणुकदारांना एकाच दिवसात तब्बल 8 लाख कोटींचा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांनी आपला मोर्चा अमेरिकन शेअर बाजाराकडे (American stock market)वळवल्यामुळे जगभरातील इतर शेअर बाजारांना मोठा फटका बसला आहे.
आसाममध्ये राहुल गांधी अडचणीत! मुख्यमंत्री हिमंता यांनी पोलिसांना दिल्या ‘या’ सूचना…
आज शेअर बाजाराची सुरुवात होत असतानाच निगेटिव्ह दिसून आली. त्यानंतर मात्र काही वेळ सेन्सेक्स आज 71 हजार 868 वर ओपन झाला. त्यानंतर काहीवेळासाठी तो 72 हजारांवर ट्रेड करत होता.
मात्र काही वेळातच तो 70 हजारांच्या खाली आला. त्यानंतर मात्र तो 1600 अंकांची घसरण दिसून आली. आणि आजचा दिवस हा अमंगल ठरला. शेअर बाजारासाठी हा काळा दिवस असल्याचेही गुंतवणुकदारांनी म्हटले आहे.
शेअर बाजारातील आजच्या टॉप लूजर्सच्या यादीत कोल इंडिया, ओएनजीसी, एसबीआय लाईफ, बीपीसीएल आणि एसबीआयच्या शेअर्सचा समावेश आहे. मंगळवारी इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये 6.33 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.
त्याचबरोबर शेअर बाजारातील टॉप गेनर्समध्ये सन फार्मा, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, डॉ. रेड्डीज, हिरो मोटोकॉर्प आणि अपोलो हॉस्पिटलच्या शेअर्सचा समावेश आहे.