Download App

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न; दोन दहशतवादी ठार

Jammu Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली आहे. येथे लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. कुपवाडामधील माछिल सेक्टरमधील कुमकारी हैहामामध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली.

गुरुवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री दोन दहशतवादी पाकिस्तानच्या सीमेवरून एका बोगद्याद्वारे भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करत होते. येथे तैनात असलेल्या जवानांनी घुसखोरांना आव्हान दिले, त्यानंतर चकमक सुरू झाली आणि गोळीबारात दोन्ही दहशतवादी ठार झाले. भारतीय लष्कराला कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं केवळ 3 वर्षासाठी भारतात, वाघनखं ‘या’ दिवशी येणार

शोध मोहीम सुरूच
जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार शोध मोहीम अजूनही सुरू आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. आणखी दहशतवाद्यांची घुसखोरी होण्याची शक्यता स्थानिक सूत्रांनी व्यक्त केली आहे. याशिवाय मृतदेह बाहेर काढण्यासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. या भागात सध्या सर्वसामान्यांना येण्यास बंदी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं केवळ 3 वर्षासाठी भारतात, वाघनखं ‘या’ दिवशी येणार

अनंतनागमध्येही चकमक
या महिन्याच्या 14 तारखेला जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्येही चकमक झाली. यामध्ये भारतीय लष्कराचे दोन अधिकारी आणि एका जवानाव्यतिरिक्त जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी शहीद झाले होते. अनंतनागच्या जंगलात डोंगराच्या गुहांमध्ये दहशतवादी लपले होते, त्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कराने 5 दिवस ऑपरेशन केले होते.

Tags

follow us