पाकच्या ‘जे -17’ ला धुडकावत युएईची ब्रह्मोसला पसंती; राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन भारत दौऱ्यावर

UAE prefers BrahMos संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईने भारतासोबत कोट्यवधी डॉलर्सचे संरक्षण करार करण्याची शक्यता आहे.

UAE prefers BrahMos

UAE prefers BrahMos

UAE prefers BrahMos over Pakistan’s ‘J-17’; President Sheikh Mohammed bin Rashid on India visit : संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईने भारतासोबत कोट्यवधी डॉलर्सचे संरक्षण करार करण्याची शक्यता आहे. यामध्ये युएई विशेषतः भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करू शकते. याचं कारण म्हणजे गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राने दमदार कामगिरी केली होती. ज्याच्याद्वारे पाकिस्तानचे 11 एअरबेस उध्वस्त करण्यात आले होते. त्यामुळे भारताच्या ब्रह्मोस मागणी वाढली आहे. या अगोदर फिलिपाईन्सने देखील ब्रह्मोस खरेदीसाठी ऑर्डर दिली आहे. त्यानंतर आता राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी सोमवारी 19 जानेवारी रोजी भारताचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा संरक्षण करार केला. ज्यामध्ये भारत आणि युएई हे मिळून त्या शस्त्र निर्मिती करणार आहेत.

बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; A+ श्रेणीतील खेळाडूंना बसणार धक्का

दुसरीकडे पाकिस्तानकडून वारंवार ‘जे -17′ या लढाऊ विमानाच्या खरेदी बाबत दावे केले जात आहे की, या महिन्याच्या सुरुवातीला इंडोनेशिया आणि सौदी अरब यांच्यासोबत अनेक देशांनी जे -17’ लढाऊ विमान खरेदी केले आहे. मात्र तज्ज्ञांच्या माहितीनुसार पाकिस्तानचे हे दावे पूर्णतः खोटे आहेत. मात्र भारताचं घातक असं ब्रह्मोस अनेक देश खरेदी करायचं आहे. त्यामध्ये संयुक्त अमिरातीचा भारतासोबतचा एक संरक्षण करार अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही देशांमध्ये ब्रह्मोस क्रूज क्षेपणास्त्राच्या करारावर चर्चा सुरू आहे. त्यामध्ये काही अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

EVM ला बाय-बाय; बॅलेट पेपरवर होणार स्थानिक निवडणुका, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

या अडचणींमध्ये एमटीसीआर (290 किलोमीटर रेंज लिमीट) ही एक अडचण आहे. त्याचबरोबर रशियाची मंजुरी घेण्याची गरज आहे. मात्र दिल्ली दौऱ्यावर असताना युएईच्या राष्ट्रपतींची भारताच्या विकसनशील डिफेन्स इंडस्ट्री आणि पॉवर डायनामिक्समध्ये रूची दिसून आली. तसेच ब्रह्मोस हे सामान्य क्षेपणास्त्र नाहीये तर भारताच्या एमटीसीआरमध्ये समाविष्ट झाल्यानंतर त्याची रेंज वाढवून 450 किलोमीटर हुन अधिक करण्यात आली आहे. मात्र युएई हे एमटीसीआरचं सदस्य नाही.

बहुमत असूनही भाजप-शिंदे नाही तर ठाकरेंचा महापौर होणार? आरक्षणाचा तिढा नेमका काय?

पाकिस्तान देखील युएईला ‘जे -17’ फायटर विमान विकण्याची योजना आखत आहे. मात्र युएईने त्यावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्याऐवजी जेव्हा युएईचे राष्ट्रपती पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते गेले होते. त्यावेळी त्यांनी डिप्लोमसी किंवा करारांवर चर्चा करण्याऐवजी दुर्मिळ पक्ष्यांची शिकार आणि पाकिस्तानी सैन्याच्या फौजी फॉउंडेशन एक अरब डॉलर दान करण्यामध्ये रूची दाखवली होती.

Exit mobile version