छत्तीसगडचे (chhattisgarh) मुख्यमंत्री भूपेश बघेल (bhupesh baghel) यांनी सोमवारी विधानसभेत पुढील वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. वर्षअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भूपेश बघेल यांनी अर्थसंकल्पात अनेक लोकाभिमुख घोषणा केल्या आहेत. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी 18 ते 35 वर्षे वयोगटातील बेरोजगार तरुणांना दरमहा 2500 रुपये बेरोजगार (unemployment) भत्ता देण्याची घोषणा केली आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना ते म्हणाले की, छत्तीसगडच्या जनतेने आम्हाला चार वर्षांपूर्वी निवडून दिले आणि आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही जनतेच्या आकांक्षा पूर्ण केल्या आहेत. शेतकरी, महिला आणि युवक, प्रत्येक घटकाला सक्षम केले आहे.
हेही वाचा : Mohan Bhagwat : ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारतात बेरोजगारी नव्हती, मोहन भागवत यांचा दावा
बेरोजगारांसाठी अर्थसंकल्पात बेरोजगार भत्त्याची तरतूद करण्याची घोषणा त्यांनी केली. भूपेश बघेल म्हणाले की, 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील प्रत्येक बेरोजगार तरुणाला दरमहा 2500 रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाईल. अंगणवाडी सेविकांचे मानधन 6000 वरून 10 हजार रुपये आणि सहाय्यकांचे मानधन 3550 वरून 5000 रुपये बजेटमध्ये वाढवण्याची घोषणाही त्यांनी केली.
आपल्या बजेट भाषणात भूपेश बघेल म्हणाले की, “एक काळ असा होता की छत्तीसगडचे नाव घेताच नक्षली हिंसाचाराच्या घटना आठवल्या जायच्या. पर्यटकांच्या मनात प्रश्नचिन्ह असायचे. पण अलीकडेच छत्तीसगडमध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड क्रिकेट लीग आयोजित करण्यात आली होती, या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटला. सेलिब्रिटी क्रिकेट लीगचेही नुकतेच आयोजन करण्यात आले होते. अचानक इतका बदल झाला आहे की आता देशातील जनता छत्तीसगडमध्ये येण्यास उत्सुक आहे. बॉलीवूड कलाकार राज्यात चित्रपट आणि वेब सीरिजचे शूटिंग करत आहेत. पर्यटकांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. आपले राज्य देशाला नवा मार्ग दाखवत आहे.”