Union Budget 2025 : संसदेत आज केंद्रीय अर्थसंकल्प (Budget) सादर झाला. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात मांडला. यंदाच्या अर्थंसंकल्पात सामान्य जनता, नोकरदार, शेती, शिक्षण, रेल्वे, आरोग्य आणि टॅक्स स्लॅबसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यात संरक्षण क्षेत्रासाठी ( defense budget ) केलेल्या तरतुदींमध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे.
Budget 2025 : अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की…
संरक्षण क्षेत्रासाठी 6.81 लाख कोटींची तरतुद करण्यात आली आहे. जी गेल्या वर्षी 6.2 होती ती थेट 6.81 लाख कोटींवर गेली आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रासाठी ही मोठी वाढ मानली जात आहे. यामध्ये 6.81 लाख कोटींपैकी 4.88 लाख कोटी महसुली खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, देखभालीसाठी, 1.9 लाख कोटी भांडवली खर्च ज्यामध्ये नविन उपकरण खरेदी, आधुनिकीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तरतुद करण्यात आली आहेत. तर 1.60 लाख कोटी निवृत्ती वेतनासाठी असणार आहे.
महाकुंभातील व्हायरल मोनालिसासाठी अर्थसंकल्प ठरलाय वरदान, का? घ्या जाणून सविस्तर…
निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प देशाला समृद्धीकडे नेणारा असल्याचे म्हटले आहे. यंदाच्या अर्थंसंकल्पात सामान्य जनता, नोकरदार, शेती, शिक्षण, रेल्वे, आरोग्य आणि टॅक्स स्लॅबसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्याचबरोबर दरवर्षी बजेटनंतर काही गोष्टी स्वस्त होतात तर काही महाग होतात. या वर्षीच्या अर्थसंकल्पानंतर जाणून घेऊया कोणत्या वस्तूंच्या किमती वाढत आहेत आणि कोणत्या वस्तू स्वस्त होत आहेत.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काय स्वस्त, काय महाग होणार?
स्वस्त काय झालं?
टीव्हीचे पार्ट्स स्वस्त होणार
मोबाईल च्या बॅटरीसंदर्भातील 20 भांडवली वस्तूंना सूट
कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 56 औषधं कस्टम ड्युटी फ्री
भारतात बनवलेले कपडे स्वस्तात विकले जाणार.
6 जीवरक्षक औषधे स्वस्त होतील.
वैद्यकीय उपकरणे स्वस्त होणार.
82 वस्तूंवरील उपकर काढला जाणार
सोशल मीडियावर धमाका, ‘आता थांबायचं नाय’ चे दमदार टायटल पोस्टर लाँच
काय महाग होणार?
अर्थसंकल्पात अनेक वस्तू स्वस्त होतील, असं प्रस्तावित करण्यात आलंय. तर काही गोष्टींवर कर वाढण्याची शक्यता आहे, सरकारने अद्याप याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आणि आता KCC मर्यादा 5 लाख रुपये करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर यापूर्वी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा केवळ 3 लाख रुपये होती.