Download App

मोठी बातमी ! केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या ताफ्यावर हल्ला, हॉकी स्टिकने फोडली कारची काच

Gajendra Singh Shekhawat : केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या ताफ्यातील एका वाहनावर हल्ला करण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली

  • Written By: Last Updated:

Gajendra Singh Shekhawat : केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि भाजप नेते (Gajendra Singh Shekhawat) यांच्या ताफ्यातील एका वाहनावर हल्ला करण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, 14 मार्चच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही मात्र केंद्रीय मंत्र्याच्या वाहनावर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, अज्ञात आरोपीने हॉकी स्टिकने मारून कारची पुढची काच फोडली. रावजी गैर यात्रेत सहभागी होण्यासाठी गजेंद्र सिंह शेखावत जोधपूरमधील मंडोर येथे पोहोचले होते. सध्या या प्रकरणात पोलिसांनी तीन ते चार जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणात पुढील तपास सुरु केला आहे.

माहितीनुसार, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि पोलिस प्रशासनाच्या वाहनांचा ताफा मंडोर गार्डनच्या बाहेर उभा होता. जेव्हा त्यांचा ताफा रावजी गैर येथे पोहोचला तेव्हा गर्दीमुळे एका हल्लेखोराने पार्क केलेल्या गाडीच्या काचेवर हल्ला केला आणि पळून गेला.

मोठी बातमी! पाकिस्तानात आणखी एक आयसीसी टूर्नामेंट; वेळापत्रकही जाहीर

याबाबत एसीपी मंदोर नागेंद्र कुमार म्हणाले की, हल्लेखोराची ओळख पटविण्यासाठी जवळच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. हल्लेखोराने गाडीच्या काचेवर काठी किंवा हॉकी स्टिकने हल्ला केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

‘मंत्री कोकाटेंना शिक्षा दिली तर त्यांच्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल’, नाशिक न्यायालयाचं निरीक्षण

follow us

संबंधित बातम्या