उत्तर प्रदेशातील महिलांना मिळणार 50 हजारांची मदत? योगी सरकारचा मोठा प्रस्ताव चर्चेत

Yogi Adityanath उत्तर प्रदेश सरकार महिलांना 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे.

yogi adityanath

yogi adityanath

Yogi Adityanath Considers Financial Assistance of Up to 50,000 for Women : उत्तर प्रदेशातील महिलांसाठी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारकडून 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. हे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट DBT च्या माध्यमातून जमा करायचे की शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकासाशी संबंधित योजनांद्वारे मदत द्यायची, यावर सरकारकडून चर्चा सुरू आहे.

Australia vs Bangladesh 1st Test: बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर कांगारुंनी नांग्या टाकल्या;198 धावांवर रोखले !

एकरकमी 50 हजारांऐवजी योजनांचा विस्तार?

सरकारकडून प्रत्येक पात्र महिलेला थेट 50 हजार रुपये देण्याऐवजी आधीपासून सुरू असलेल्या महिला-केंद्रित योजनांचा विस्तार करण्याचा पर्यायही तपासला जात आहे. यामध्ये मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना, राणी लक्ष्मीबाई स्कूटी योजना, निराश्रित महिला पेन्शन योजना, राणी लक्ष्मीबाई महिला एवं बाल सन्मान कोष आणि मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना यांसारख्या योजनांचा समावेश आहे.

भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना शिर्डी पोलीस ठाण्यात हजर ; शेतकऱ्याच्या फसवणुकीप्रकरणी नोंदवला जबाब

याशिवाय स्वयं-सहायता गट आणि ‘लखपती दीदी’ उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावरही भर दिला जाऊ शकतो. ज्येष्ठ महिलांसाठी यूपी रोडवेजच्या मोफत प्रवासासारख्या सुविधांचाही विस्तार करण्याचा पर्याय चर्चेत आहे.

थेट बँक खात्यात पैसे देण्याचाही पर्याय

प्रस्तावित 50 हजार रुपयांचे सहाय्य थेट महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या पर्यायाचीही सरकारकडून पडताळणी केली जात आहे. मात्र, ही रक्कम कोणाला, किती आणि कोणत्या पद्धतीने द्यायची, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे 50 हजार रुपयांची मदत निश्चित झाल्याचे सध्या म्हणता येणार नाही.

Exit mobile version