Atique Ahmed : गाडीला अपघात, रस्त्यात लघुशंका अतिकला नेताना नेमके काय-काय घडले?

Atique Ahmed Police Arrest :  उत्तर प्रदेशचा गँगस्टर अतीक अहमदला उत्तर प्रदेश पोलिस गुजरातच्या साबरमती जेलमधून उत्तर प्रदेशमध्ये घेऊन येत आहेत. 28 मार्च रोजी अतीक अहमदला प्रयागराजच्या एमपी एमएलए कोर्टात हजर केले जाणार आहे. यावेळी त्याला गुजरातमधून घेऊन येत असताना त्याची गाडी पलटणार असे बोलले जात आहे. उमेश पाल हत्याकांडामध्ये अतीक अहमदचे नाव समोर आले […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 27T162405.592

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 27T162405.592

Atique Ahmed Police Arrest :  उत्तर प्रदेशचा गँगस्टर अतीक अहमदला उत्तर प्रदेश पोलिस गुजरातच्या साबरमती जेलमधून उत्तर प्रदेशमध्ये घेऊन येत आहेत. 28 मार्च रोजी अतीक अहमदला प्रयागराजच्या एमपी एमएलए कोर्टात हजर केले जाणार आहे. यावेळी त्याला गुजरातमधून घेऊन येत असताना त्याची गाडी पलटणार असे बोलले जात आहे.

उमेश पाल हत्याकांडामध्ये अतीक अहमदचे नाव समोर आले आहे. यानंतर अनेक भाजप नेत्यांच्या विधानांवरुन असा अंदाज बांधला जात आहे की, त्याची गाडी पलटली जाणार. याआधी बिकरु कांडातील आरोपी विकास दुबे याची गाडी रस्त्यामध्ये पलटी झाली होती. तेव्हा त्यांचा एनकाउंटर झाला होता. अगदी त्याचप्रकारे अतीक अहमदची गाडी पलटी होणार असे बोलले जात आहे.

मतासाठी लोणी लावणार नाही, नाहीतर माझ्याजागी दुसरा कोणीतरी येईल; गडकरींकडून राजकीय निवृत्तीचे संकेत

अतीक अहमदच्या गाडीच्या ताफ्यांच्या मागे त्याची बहीण आयेशा नुरी सावलीसारखी चालत आहे. यागाडीमध्ये अतीकच्या बहिणीबरोबर त्याचे वकील देखील आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही त्यांचा पाठलाग नाही करत आहोत. परंतु आम्हाला अतीकच्या सुरक्षेवरुन भिती वाटत आहे. अतीक अहमदच्या गाड्यांचा ताफा गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेश येथून पार करुन उत्तर प्रदेशमध्ये पोहोचला आहे.

अतीक अहमद हा युपीच्या पोलिसांना इतका घाबरला आहे की, लघवी करण्यासाठी देखील तो रस्त्याच्या मध्ये थांबला होता. काही माध्यमांनी त्याचे प्रक्षेपण देखील केले आहे. याआधी विकास दुबेचा ज्याप्रकारे एनकाउंटर करण्यात आला होता. तसाच एनकाउंटर आपला होईल अशी भिती अतिकला आहे म्हणून बाजूला न जाता रस्त्याच्या मध्येच त्याने लघवी केली आहे. अतीक अहमदला घेऊन येताना मध्य प्रदेशच्या शिवपुरी येथे अचानक गाडीसमोर गाय आली. या धडकेत गायीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. यानंतर काही वेळाने गाड्यांचा ताफा प्रयागराजच्या दिशेने चालू लागला आहे.

Cm Eknath Shinde : उद्धव ठाकरे हे राहुल गांधींच्या थोबाडीत लगावणार का?

दरम्यान,  24 फेब्रुवारी रोजी उमेश पाल व त्याचा दोन गनर्स यांची हत्या करण्यात आली होती. उमेश पाल हा राजू पाल हत्याकांडात कोर्टात साक्षी होता. उमेश आपल्या गाडीतून उतरताच गुंडांनी त्याच्यावर फायरिंग केली होती.

उमेश पाल यांच्या हत्येचा आरोप अतीक अहमदवर लागला आहे. अतीकने साबरमतीच्या जेलमधूनच या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा संशय आहे. अतीक अहमद हा राजूपाल हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. उमेश पाल हा राजूपाल हत्याकांडात आरोपी होता.

Exit mobile version