Uttarkashi Rescue : लुडो, पत्ते अन्… बोगद्यात अडकलेल्या मजुरांसाठी मास्टर प्लॅन

Uttarkashi Rescue : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये चार धाम प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेला सिल्क्यरा बोगद्यात गेल्या 13 दिवसांपासून 41 मजूर अडकून पडले आहेत. या सर्वांना वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, यानंतरही अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात यश आलेले नसून, या सर्वांना अन्न, पाणी, औषध आणि ऑक्सिजन पाईपद्वारे कामगारांना पाठवले जात आहे. या सर्वांमध्ये आता बोगद्यात अडकलेल्या […]

Uttarkashi Rescue : लुडो, पत्ते अन्... बोगद्यात अडकलेल्या मजुरांसाठी मास्टर प्लॅन

Letsupp Image 2023 11 24T120315.926

Uttarkashi Rescue : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये चार धाम प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेला सिल्क्यरा बोगद्यात गेल्या 13 दिवसांपासून 41 मजूर अडकून पडले आहेत. या सर्वांना वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, यानंतरही अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात यश आलेले नसून, या सर्वांना अन्न, पाणी, औषध आणि ऑक्सिजन पाईपद्वारे कामगारांना पाठवले जात आहे. या सर्वांमध्ये आता बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे मानसिक स्वास्थ्य संतुलित राहण्यासाठी पाईपद्वारे लुडो, पत्ते आदी पाठवण्याची योजन आखली आहे.

Maharashtra Politics: ‘भाजपने पनौती हा शब्द…; संजय राऊतांचा खोचक टोला

अनेक अडचणींमुळे रेस्क्यू खोळंबले

उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, येणाऱ्या अनेक अडथळ्यांमध्ये करण्यात येणारे रेस्क्यू ऑपरेश खोळंबले आहे. या सर्वात आता आत अडकलेल्या मजुरांचे मानसिक संतुलन चांगले राहवे यासाठी रेस्क्यू टीमने सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना बोर्ड गेम्स आणि पत्ते देण्याची योजना आखली आहे.

कपिल शर्माचा एका उच्चभ्रू महिलेला रात्रभर फोन? पतीलाही शिवीगाळ केल्याचा पीडितेचा दावा…

मनोचिकित्सकांचे मत काय?

सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या कामगांची सुखरूप सुटका होण्यासाठी सर्व स्तरातील तज्ज्ञांची मदत घेतली जात असून, घटनास्थळी मनोचिकित्सकदेखील उपस्थित आहेत. यातील डॉ. रोहित गोंदवाल यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ” बोगद्यात अडकलेले कामगार तणावमुक्त राहणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही पाईपच्या माध्यमातून लुडो, बुद्धिबळ आणि पत्ते पाठवण्याची योजना आखली आहे. बोगद्यातील सर्व 41 कामगार उत्तम आहेत पण त्यांना निरोगी आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याची गरज आहे.

चोर पोलीस, योगासन अन्…

बोगद्यात अडकलेल्या एका कामगाराने सांगितले की, आम्ही आमचा तणाव कमी करण्यासाठी कधी ‘चोर-पोलीस’ खेळतो, योगासने करतो आणि रोज व्यायाम करत असल्याचे सांगितले. याशिवाय बाहेर असणाऱ्या डॉक्टरांकडूनही आमच्या आरोग्याबाबत आणि मानसिक स्थितीबाबत माहिती घेतली जात आहे.

आज रात्रीपर्यंत कामगार बाहेर पडण्याची अपेक्षा 

उत्तरकाशी बोगदा बचावासाठी पीएमओचे माजी सल्लागार भास्कर खुल्बे म्हणाले की, आता येथील परिस्थिती बरी आहे. काल रात्री आम्ही मशीनचे प्लॅटफॉर्म पुन्हा कॉन्फिगर केले आहे. यानंतर आता आम्ही ऑगर ड्रिलिंगची प्रक्रिया सुरू केली असून, ग्राउंड पेनिट्रेशन रडारचा वापर करून पार्सन्स कंपनीने पुढील 5 मीटरपर्यंत मेटलचा कोणताही अडथळा नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ड्रिल मशिनने नीट काम केल्यास पाईप बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या अगदी जवळ पोहोचेल.  ठरवलेल्या सर्व गोष्टी अडथळ्यांशिवाय पूर्ण झाल्यास बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 मजूर आज रात्रीपर्यंत बाहेर येऊ शकतील.

Exit mobile version