Download App

Uttarkashi tunnel collapse : टनल बाहेर बांधणार बाबा बौखनाग मंदीर; काय आहे कनेक्शन ? जाणून घ्या…

  • Written By: Last Updated:

Uttarkashi tunnel collapse : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi tunnel collapse ) अडकलेल्या 41 मजुरांना वाचविण्यात यश आले आहे. रॅट मायनिंगच्या माध्यमातून तब्बल 17 दिवसानंतर आज सर्व मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे.त्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून या मजुरांना एक लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य, त्याचबरोबर या टनलच्या बाहेर स्थानिक देवता बाबा बौखनाग यांचे मंदिर बांधण्याची देखील घोषणा करण्यात आली.

बाबा बौखनागचं काय कनेक्शन आहे?

उत्तरकाशी बोगद्यामधून बाहेर पडलेल्या मजुरांची सुरक्षा ही बाबा बौखनाग यांनी केल्याचे येथील लोकांच्या धार्मिक भावना आहेत. दरम्यान ज्यावेळी हा बोगदा कोसळला त्यावेळी हा दैवी प्रकोप असून बाबा बौखनाग यांच्यामुळेच हा अपघात घडला. तसेच त्यांच्याच कृपेने हे मजूर बाहेरही आल्याचं स्थानिक लोक मानतात.

गुवाहाटीत ऋतुराजनंतर मॅक्सवेलचे वादळ ! शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाने भारताला हरविले

या मजुरांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू असतानाच स्थानिकांची ही चर्चा रेस्क्यू टीम पर्यंत पोहोचली. या लोकांचं म्हणणं होतं की, या बाबा बौखनागांचं मंदिर पाडण्यात आलं. जेव्हा हे टनल निर्माण करायचं होतं. त्यामुळे जोपर्यंत हे मंदिर बांधलं जात नाही. तोपर्यंत मजुरांचे बाहेर येणे अवघड आहे.

दूध दरवाढीसाठी उपोषण! शरद पवारांचा पत्र धाडत उपोषणकर्त्यांना दिलासा; म्हणाले..,

त्यामुळे लगेचच या टनलच्या बाहेर बाबा यांचे एक मंदिर स्थापन करण्यात आलं. तिथे पूजा विधी देखील सुरू करण्यात आली. तर आज जेव्हा रेस्क्यू टीम या मजुरांपर्यंत पोहोचली. त्या अगोदर आंतरराष्ट्रीय टनल विशेषज्ञ अर्नोल्ड डिस्क यांनी देखील या मंदिरात पूजा केली. तर मुख्यमंत्री धामी यांनी देखील या मजुरांचं वाचणं बाबा बौखनागांची कृपा म्हटलं आहे.

कोण आहेत बाबा बौखनाग ?

येथील स्थानिक लोकांकडून बाबा बौखनाग यांना या भागातील डोंगर-दऱ्यांचे रक्षक मानलं जात. तर उत्तरकाशी या भागामध्ये बौखनाग यांचे एक मंदिरही आहे. तसेच याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते की, बाबा बौखनाग हे नागाच्या रूपामध्ये प्रकट झाले होते. तसेच दरवर्षी या ठिकाणी यात्राही भरते. तर लोकांची अशी भावना आहे की, डोंगरदऱ्यांमध्ये राहणारे बाबा बौखनाग हे प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात.

त्यामुळे असं देखील म्हटलं जातं की उत्तर काशीमध्ये अशा प्रकारचा टनल जेव्हा निर्माण केला जातो. त्यावेळेस त्याच्या प्रवेशाच्या ठिकाणी बाबा बौखनागचं मंदिर बनवलं जातं. त्यामुळे या सिलक्यारा टनलच्या बाहेर देखील मजूर अडकल्यानंतर एक मंदिर स्थापन करण्यात आलं. त्याचबरोबर या प्रोजेक्टचे मॅनेजर राजेश्वर पवार यांनी बाबा बौखनाग यांच्या दरबारात म्हणजेच भाटिया या गावांमध्ये जाऊन मजुरांच्या सुरक्षित बाहेर निघण्यासाठी प्रार्थना केली होती.

Tags

follow us