लडाखमध्ये मोठी दुर्घटना; लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने 9 जवान शहीद

Indian Army : लडाखमध्ये (Ladakh) एक मोठी दुर्घटना घडली आहे. कियारी (Kyari) शहरापासून 7 किमी अंतरावर झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराचे (Indian Army) 9 जवान शहीद झाले आहेत. त्यांचे वाहन खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला आहे. सैनिक कारू चौकीतून लेहजवळील कायरीकडे जात होते. शहीद झालेल्यांमध्ये एक जेसीओ आणि उर्वरित 8 जवान आहेत. भारतीय […]

नाकाबंदी, सर्च ऑपरेशन अन् अतिरेक्यांचे स्केच.. जम्मूतील हल्ल्यांचा बदला घेण्यास भारत सज्ज

नाकाबंदी, सर्च ऑपरेशन अन् अतिरेक्यांचे स्केच.. जम्मूतील हल्ल्यांचा बदला घेण्यास भारत सज्ज

Indian Army : लडाखमध्ये (Ladakh) एक मोठी दुर्घटना घडली आहे. कियारी (Kyari) शहरापासून 7 किमी अंतरावर झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराचे (Indian Army) 9 जवान शहीद झाले आहेत. त्यांचे वाहन खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला आहे. सैनिक कारू चौकीतून लेहजवळील कायरीकडे जात होते. शहीद झालेल्यांमध्ये एक जेसीओ आणि उर्वरित 8 जवान आहेत.

भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एएलएस वाहन लेहहून न्योमाकडे जात होते. संध्याकाळी 5:45 ते 6:00 च्या सुमारास ते कायरीच्या 7 किमी आधी दरीत घसरले. गाडीत लष्कराचे 10 जवान होते. यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला. एकजण जखमी झाला. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, लडाखमधील लेहजवळ झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या मृत्यूने मी दु:खी आहे. त्यांनी देशासाठी केलेली अतुलनीय सेवा आम्ही कधीही विसरणार नाही. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी जवानांना फील्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version