Prabal Pratap : ऑफिसमध्ये महिलेचा छळ अन् आता सर्वोच्च न्यायालयात शिवीगाळ; कोण आहे प्रबल प्रताप यादव?

Prabal Pratap :  सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात न्यायाधीशांना "न्यायिक सेवक" (judicial servants) म्हणणारा आणि हवेत कागदपत्रे

Prabal Pratap

Prabal Pratap

Prabal Pratap :  सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात न्यायाधीशांना “न्यायिक सेवक” (judicial servants) म्हणणारा आणि हवेत कागदपत्रे भिरकावूण भारताच्या सरन्यायाधीशांचा अपमान करणारा प्रबल प्रताप यादव सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून प्रबल यादवबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, प्रबल प्रताप यादव (Prabal Pratap Yadav) उत्तर प्रदेशातील इटावा येथील रहिवासी असून लखनौच्या विकास नगरमधील एका सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीत तो टेक प्रोफेशनल म्हणून काम करत होता. काम करत असताना त्याने ऑफिसमध्ये एका मुस्लिम महिला सहकाऱ्याला टार्गेट करुन तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने महिला सहकाऱ्याला आक्षेपार्ह, धमकावणारी व अपमानास्पद भाषा असलेले ई-मेल्स पाठवले. यानंतर महिलाने कंपनी व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार दिली.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर, कंपनीने सुरुवातीला प्रबल प्रतापला आपली वागणूक सुधारण्यासाठी ताकीद दिली होती मात्र तरीही त्याने महिलेला त्रास देण्यास बंद न केल्याने कंपनीने त्याला नोकरीवरुन काढून टाकले.  नोकरी गमावल्यानंतर प्रबल प्रताप याने कंपनीवर “राष्ट्रविरोधी कारवाया” आणि “सायबर गुन्ह्यांमध्ये” सहभागी असल्याचा आरोप करत खोटे दावे केले. नोव्हेंबर 2025 मध्ये, राष्ट्रविरोधी कारवायांचा आरोप करत त्याने कंपनीविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यासाठी अर्ज केला.  

पोलीस अहवालाच्या आधारे, न्यायालयाने या प्रकरणाकडे केवळ एक “तक्रार प्रकरण” (Complaint Case) म्हणून पाहिले. लखनौ न्यायालयाने त्याच्या इच्छेनुसार एफआयआर त्वरित नोंदवण्याचे आदेश दिले नाहीत, तेव्हा ६ एप्रिल २०२६ रोजी त्याने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली आणि हे तथ्य कनिष्ठ न्यायालयासमोर मांडण्याचे निर्देश दिले.

उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर आरोपीने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली. शुक्रवारी न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती आलोक यांच्यासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान, वकिलाचा पेहराव परिधान करूनही त्याने न्यायालयाच्या प्रतिष्ठेचे भान राखले नाही. तुटक इंग्रजीत बोलताना त्याने न्यायाधीशांचा उल्लेख “न्यायिक सेवक” असा केला. इतकेच नाही तर, त्याने न्यायाधीशांनाच आदेश देण्याच्या सुरात ओरडून म्हटले, “मिस्टर ज्युडिशिअल सर्व्हंट (न्यायिक सेवक), मी तुम्हाला आदेश देतो की तुम्ही लखनौच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश द्यावेत.” त्यानंतर त्याने आपल्या हातातील कागदपत्रे हवेत भिरकावली.

आरोप खोटे, 3 रुमचं घर आणि ऑटोमॅटीक गाडीची मागणी; सूनेच्या आरोपांवर विनायक राऊतांची पहिली प्रतिक्रिया –

सुरक्षा कर्मचारी त्याला बाहेर नेण्यासाठी पुढे आले असता, “हे सरन्यायाधीशांना (CJI) द्या,” असे म्हणत त्याने उरलेली कागदपत्रेही भिरकावली आणि भारताच्या सरन्यायाधीशांविरुद्ध आक्षेपार्ह व शिवराळ भाषेचा वापर केला. त्याने  सरन्यायाधीशांविरुद्ध आक्षेपार्ह व शिवराळ भाषेचा वापर केल्यानंतर देखील  दोन्ही न्यायाधीशांनी (न्यायमूर्ती विश्वनाथन आणि न्यायमूर्ती आलोक) अत्यंत संयम राखला. आरोपीच्या या गैरवर्तनानंतरही, त्याच्याविरुद्ध कोणताही नवीन गुन्हा दाखल न करण्याचे औपचारिक आदेश न्यायालयाने दिले. तरीही, सुरक्षेच्या कारणास्तव त्याला त्वरित पोलीस कोठडीत घेण्यात आले.

Exit mobile version