Download App

VHP Alok Kumar : धर्मांतर करणाऱ्या दलितांना आरक्षणाचा लाभ देऊ नये, आरक्षणावरून नवा वाद?

  • Written By: Last Updated:

“ज्या दलितांनी इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल त्यांना आरक्षणाचा (Reservation) लाभ देऊ नये” असं वादग्रस्त विधान विश्व हिंदू परिषदेचे (VHP) कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार (Alok Kumar) यांनी केलं आहे. या विधानानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

विहिंपचे राष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की, संविधान बनवताना हिंदू धर्मातील अनुसूचित जाती/जमातीच्या लोकांसाठी आरक्षणाची सुविधा निश्चित करण्यात आली होती. समाजातील अशा वर्गांच्या उन्नतीसाठी हा उपाय करण्यात आला. मात्र आता धर्मांतरित लोकांनीही स्वत:साठी ही सुविधा देण्याची मागणी सुरू केली आहे, जी अन्यायकारक आहे.

हेही वाचा : घर सांभाळणाऱ्या महिलाही कमी नाहीत; देशाच्या GDP मध्ये देतात ‘इतक्या’ कोटींचे योगदान,

ते म्हणाले की, या धर्मांचा दावा आहे की कोणत्याही प्रकारचा सामाजिक भेदभाव नाही. अशा परिस्थितीत त्यांना तिथे कोणत्याही भेदभावाला सामोरे जावे लागत नाही. तसे असल्यास या वर्गांना आरक्षण देण्याचा कोणताही फायदा नाही. कारण त्यांना धर्मात ज्या प्रतिकूल कारणांना सामोरे जावे लागत आहे. त्या SC/ST लोकांना पळून जावे लागत नाही. या आधारावर धर्मांतरितांना आरक्षणाची सुविधा मिळू नये, असे ते म्हणाले.

सोमवारी विहिंपचे राष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी हे विधान केलं. ते म्हणाले की विश्व हिंदू परिषद लवकरच यासाठी संपूर्ण देशव्यापी अभियान सुरू करणार आहे. केंद्र सरकारने यासाठी एक समिती गठित केली असून धर्मांतरित लोकांना आरक्षणाचा लाभ देण्याविषयीचा प्रस्ताव विचाराधीन आहे. पण, विहिंप या समितीच्या उद्देशांविषयी साशंक आहे आणि या विषयावर व्यापक स्वरुपात चर्चात्मक बैठकीचं आयोजन करण्याच्या विचारात आहे.

Tags

follow us