मोठी बातमी ! ‘विजय थलपती’ तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

CM Joseph Vijay : टीव्हीके प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी

CM Joseph Vijay

CM Joseph Vijay

CM Joseph Vijay : टीव्हीके प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत टीव्हीके प्रमुख विजय यांनी जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियमवर तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शपथविधीनंतर 13 मे पर्यंत विधानसभेत विजय यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत (Tamil Nadu Assembly Election) टिव्हीकेने (TVK) सर्वांना धक्का देत तब्बल 108 जागांवर बाजी मारली होती. मात्र पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवता न आल्याने तमिळनाडूच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडताना दिसत होत्या. विजय (CM Joseph Vijay) यांनी आज काँग्रेस, सीपीआय, सीपीआय (एम), व्हीसीके आणि आययूएमएल पक्षाने पाठिंबा जाहिर केल्यानंतर तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

BREAKING: Tamilaga Vettri Kazhagam (TVK) Chief C Joseph Vijay takes oath as the Chief Minister of Tamil Nadu. #CMJosephVijay pic.twitter.com/fVsNj9hqVN

— Actor Vijay Team (@ActorVijayTeam) May 10, 2026

अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकर आज SIT समोर हजर होणार

तर दुसरीकडे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासह 9 जण मंत्री म्हणून शपथ घेणार आहे. सी. जोसेफ विजय यांनी तामिळनाडू राज्यासाठी मंत्री म्हणून नियुक्त करावयाच्या 9 व्यक्तींची यादी शिफारस केली आहे.1. एन. आनंद
2. अधव अर्जुन
3. डॉ. के.जी. अरुणराज
4. के.ए. सेंगोत्तैयन
5. पी. वेंकटरमणन
6. आर. निर्मलकुमार
7. राजमोहन
8. डॉ. टी.के. प्रभू
9. सेल्वी एस. कीर्तना

मुंबई, कोकणासह ‘या’ भागात आज उष्णेतेची लाट; यलो अलर्ट जारी –

#WATCH | Chennai: TVK Chief C Joseph Vijay introduces the Ministers-designate to Tamil Nadu Governor Rajendra Vishwanath Arlekar.

Vijay will take oath as the Chief Minister of Tamil Nadu shortly. pic.twitter.com/03AxcCSYdm

— ANI (@ANI) May 10, 2026

तामिळनाडू विधानसभेतील पक्षांची स्थिती

TVK: 108
DMK: 59
AIADMK: 47
काँग्रेस: ​​5
PMK: 4
IUML: 2
CPI: 2
VCK: 2
CPI(M): 2
BJP: 1
DMDK: 1
AMMK: 1

Exit mobile version