Download App

ऑलिम्पिकसाठी 70 लाखांची मदत; जागतिक दर्जाचे प्रशिक्षक; केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी सगळं सांगितलं

Vinesh Phogat :  पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या बाराव्या दिवशी भारतासाठी एक धक्कादायक घटना घडली ज्यामुळे सध्या संपूर्ण जगात अनेक चर्चांना उधाण

  • Written By: Last Updated:

Vinesh Phogat :  पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या बाराव्या दिवशी भारतासाठी एक धक्कादायक घटना घडली ज्यामुळे सध्या संपूर्ण जगात अनेक चर्चांना उधाण आले आहे. निर्धारित वजन मर्यादेपेक्षा जास्त वजन असल्याने कुस्तीपटू विनेश फोगटला (Vinesh Phoga) महिला 50 किलो गटाच्या फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आले.

माहितीनुसार, मंगळवारी रात्री विनेश फोगटचे वजन 2 किलो जास्त होते आणि तिने ते कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा तिने सेमीफायनल मॅच जिंकली तेव्हा तिचं वजन सुमारे 52 किलो होते आणि नंतर तिचं वजन 2 किलोने कमी करण्यासाठी तिने तिचं रक्त देखील काढले मात्र तरीही तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आल्याने तिला या स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं. तर आता या प्रकरणात देशाचे क्रीडा मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी संसदेत सविस्तर माहिती दिली आहे.

आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेने ऑलिम्पिक समितीच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. विनेशचे वजन दोन वेळा मोजण्यात आले होते मात्र शेवटी तिचे वजन 50.100 किलो असल्याचे आढळून आले. त्यामुळे तिला फायनलमध्ये भाग घेण्यापूर्वी अपात्र ठरवण्यात आले असल्याची माहिती क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.

क्रीडा मंत्री मनसुख मांडविया पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी विनेश फोगटच्या प्रकरणाबाबत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन प्रमुख पीटी उषा यांच्याशी बोलले आहे आणि त्यांना या प्रकरणात योग्य पावले उचलण्याचे निर्देशही दिले आहेत. तसेच विनेशला ऑलिम्पिकच्या तयारीसाठी सर्वतोपरी मदत करण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. विनेशच्या तयारीसाठी 70.45 लाख रुपयांहून अधिक खर्च करण्यात आले असं देखील ते यावेळी म्हणाले.

मांडविया यांनी पुढे सांगितले की, विनेश फोगटला 50 किलो गटाच्या ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले कारण तिचे वजन निर्धारित वजनापेक्षा 100 ग्रॅम जास्त होते. ती 50 किलो वजनी गटात खेळत होती.  UWW नियमांनुसार, सर्व स्पर्धांसाठी प्रत्येक कॅटिगरीमध्ये दररोज सकाळी वजन मोजले जाते. कलम 11 नुसार, जर एखादा खेळाडू उपस्थित राहिला नाही किंवा वजन जास्त भरले तर खेळाडूला शेवटच्या रँकवर ठेवले जाते.

फायनलपूर्वी विनेशच्या वजनाची दोनदा टेस्टिंग करण्यात आली होती मात्र त्याचे वजन 50.100 किलो असल्याचे आढळून आल्याने तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. पॅरिस ऑलिम्पिकसाठी विनेशला 70 लाख 45 हजार 775 रुपयांची मदत देण्यात आली असं देखील संसदेत क्रीडा मंत्री मनसुख मांडविया म्हणाले. मात्र विरोधकांना  क्रीडामंत्री मांडविया यांनी दिलेला उत्तर समाधानकारक वाटले नाही. त्यामुळे त्यांनी लोकसभेतून वॉकआऊट केला.

भुजबळ बोगस आरक्षण खाणाऱ्या समितीचा मुकादम; मनोज जरांगेंनी कोणालाही नाही सोडलं

ऑलिम्पिकच्या अकराव्या दिवशी ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहोचून विनेश फोगटने इतिहास रचत फायनलमध्ये पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. त्यामुळे  बुधवारी सकाळपर्यंत तिचे रौप्यपदक निश्चित वाटत होते मात्र तिला अपात्र ठरवल्याने कोणत्याही पदकाशिवाय ती भारतात परतणार आहे.

follow us