CJP Protest : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीकडून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे. 20 जुलै रोजी सीजेपीकडून संसदेकडे मोर्चा काढण्यात आला होता मात्र या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात येत असल्याचा दावा सीजेपीकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या मोर्च्यात अनेक पोलिसांना मारहाण करण्यात आल्याचा दावा करत आता दिल्ली पोलीस अॅक्शन मोडमध्ये असून आंदोलनादम्यान झालेल्या हिंसाचारा प्रकरणी 5 एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत कनॉट प्लेस (Connaught Place) , पार्लमेंट स्ट्रीट आणि इतर पोलीस ठाण्यांमध्ये पाच एफआयआर (FIR) दाखल केले आहेत आणि आणखी एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Violence during CJP protest march | Delhi Police have registered 5 FIRs so far at Connaught Place Police Station, Parliament Street Police Station and other Police Stations. More FIRs are likely to be registered. Accused are being identified with the help of CCTV footage: Delhi…
— ANI (@ANI) July 21, 2026
तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (20 जुलै) झालेल्या दगडफेकीत 118 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर लाठीचार्ज दरम्यान 60 आंदोलकांना दुखापत झाली. तर या दरम्यान 70 आंदोलकांना (CJP Protest) ताब्यात घेण्यात आले असल्याची देखील माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे या आंदोलनामुळे गाझियाबाद पोलीस हाय-अलर्टवर आहेत. सोमवारी सीमावर्ती भागात तपासणी मोहीम राबवण्यात आली. यूपी गेट, महाराजपूर, सीमापुरी आणि भाऊपुरा सीमांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्यावर दडपशाही… दिल्लीतील आंदोलनावरून लंके संतापले-
CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सोमवारी झालेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना म्हटले, पोलिसांनी लाठीचार्ज केला. तरुणांना मारहाण करण्यात आली, त्यांची डोकी फोडली गेली आणि त्यांना रस्त्यावरून फरफटत नेले गेले. सोनम सर यांच्या पत्नी, गीतांजली मॅडम यांना ट्रकमधून त्यांचे केस पकडून खाली ओढले गेले. आमच्या एका स्वयंसेवकाच्या बरगड्या मोडल्या. आम्ही अशा क्रूरतेची कधीच अपेक्षा केली नव्हती किंवा अशी क्रूरता कधी पाहिलीही नव्हती. CJP नेत्यांनी सोनम वांगचुक यांची सुटका, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि NEET पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे.
