Download App

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात 13 जण ठार

Manipur violence : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार (Manipur violence) भडकला आहे. राज्यातील तेंगनौपाल जिल्ह्यात हिंसाचाराची ही ठिणगी पडली आहे. सोमवारी येथे दोन गटांमध्ये (Kuki-Maitei) गोळीबार झाला होता. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्ह्यातील लेथिथू गावाजवळ दोन गटांमध्ये गोळीबार झाला. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तेथून 13 मृतदेह बाहेर काढले आहेत. या अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्याकडे घटनास्थळावरून कोणतेही हत्यार सापडले नाही. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

3 डिसेंबर रोजी तेंगनौपाल जिल्ह्यातील कुकी-जो आदिवासी गटांनी केंद्र सरकार आणि UNLEF यांच्यातील शांतता कराराचे स्वागत केले. सात महिन्यांनंतर रविवारीच राज्यात मोबाईल इंटरनेट सेवेवरील बंदी उठवण्यात आली असताना ही घटना घडली आहे. मात्र, काही जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात अजूनही निर्बंध कायम आहेत. राज्यातील इंटरनेट बंदी 23 सप्टेंबर रोजी काही काळासाठी उठविण्यात आली होती, परंतु द्वेषयुक्त भाषण आणि द्वेषपूर्ण व्हिडिओ संदेशांचा प्रसार रोखण्यासाठी 26 सप्टेंबर रोजी पुन्हा लागू करण्यात आली.

बहुचर्चित ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहाच्या शिपायाला अटक

मणिपूरमध्ये 3 मे रोजी हिंसाचार झाला होता
3 मे रोजी ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूर (ATSUM) ने ‘आदिवासी एकता मार्च’ काढला होता. चुरचंदपूरच्या तोरबांग भागात ही रॅली काढण्यात आली. मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी ही रॅली काढण्यात आली. मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. रॅलीदरम्यान आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये हिंसक चकमक झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर संध्याकाळपर्यंत परिस्थिती इतकी बिघडली की तेथे लष्कर आणि निमलष्करी दलाला तैनात करण्यात आले.

काय आहे मैतेई समाजाची मागणी?
राज्यातील मैतेई समाजाची लोकसंख्या 53 टक्क्यांहून अधिक आहे. हा एक गैर-आदिवासी समुदाय आहे आणि बहुतेक हिंदू आहेत. त्याच वेळी कुकी आणि नागा यांची लोकसंख्या सुमारे 40 टक्के आहे. राज्यात एवढी मोठी लोकसंख्या असूनही मैतेई समुदाय केवळ खोऱ्यातच स्थायिक होऊ शकतो.

Sajid Mir : 26/11 हल्ल्याच्या मास्टरमाईंडला पाकिस्तान जेलमध्येच दिलं विष…

मणिपूरचा 90 टक्क्यांहून अधिक भाग डोंगराळ आहे. फक्त 10 टक्के खोरे आहे. डोंगराळ भागात नागा आणि कुकी समुदायांचे वर्चस्व आहे तर खोऱ्यात मैतेईचे वर्चस्व आहे. मणिपूरमध्ये एक कायदा आहे. या अंतर्गत, खोऱ्यात स्थायिक झालेले मैतेई समुदायाचे लोक डोंगराळ भागात स्थायिक होऊ शकत नाहीत किंवा जमीन खरेदी करू शकत नाहीत, परंतु डोंगराळ भागात स्थायिक झालेले कुकी आणि नागा आदिवासी समुदाय खोऱ्यात स्थायिक होऊ शकतात आणि जमीन खरेदी करू शकतात. हे सर्व हिंसाचाराचे मूळ आहे.

Tags

follow us