Waqf Board Bill : संसदेत वक्फ बोर्डाच्या बिलावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचं चित्र आहे. सत्ताधाऱ्यांकडून संसदेत वक्फ बोर्ड बिल (Waqf Board Bill) मांडण्यात आल्यानंतर आज संसदेत त्यावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी यांनी विधेयकाविषयी एकेक मुद्दा घेत क्लिअर केलं. वक्फ बोर्ड बिल मुस्लिमांच्या हक्कांवर गदा आणणारं असून मदरसांना निशाणा केलं जात आहे, अखेर मुस्लिमांविषयी एवढा तिरस्कार का? असा खडा सवाल औवेसींनी केलायं.
ठरलंय! पण कधी? कुठे? कसं? “अशी ही जमवा जमवी” चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित….
पुढे बोलताना औवेसी म्हणाले, मोदी सरकारने हे युद्ध सुरु केलंय. हिंदू, शीख, जैन, बौद्दांना संरक्षण मिळेल पण त्यांना कोणीही दान देऊ शकतं. त्यांच्यासाठी मर्यादेचा कायदा लागू नाही. मुस्लिम वक्फच्या जागेवर कब्जा केला जात असून मर्यादा येत आहेत. बिलामध्ये गैरमुस्लिम प्रशासक असणार हे समानतेच्या कायद्याला धरुन नाही, तुम्ही मुस्लिमांकडून त्यांची मालमत्ता हिसकावून घेत असल्याचा आरोपही औवेसी यांनी केलायं.
तसेच इतरांना मालमत्ता सांभाळण्याचा पूर्ण अधिकार आहे, वजीर ए जाफला म्हणतात, वक्फ आणि परिषद ही इस्लामपासून वेगळं आहे त्यासाठी कायदा बनण्याची गरज नाही. हे बिल म्हणजे कलम 26चं उल्लंघन असून हिंदू, बौद्धांना मालमत्ता बाळगण्याचा अधिकार आहे तर मुस्लिमांकडून हा अधिकार का हिसकावला जात आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर मंदिरांचं संरक्षण होणार मस्जिदचं नाही. हिंदू बौद्ध मालमत्तांवर त्यांच्याच धर्माचा प्रशासक मग मुस्लिम मालमत्तांवर का नाही? असा थेट सवाल औवेसी यांनी संसदेत केलायं.
ट्रम्पच्या टॅरिफ बॉम्बवर भारताची रणनिती…प्लॅन ए, बी, सी ; कोणत्याही आव्हानासाठी तयार
दरम्यान, वक्फ बोर्ड बिलाच्या माध्यमातून मुस्लिमांवर अन्याय केला जात असून हे संविधानाच्या विरोधात आहे. सरकार मुस्लिमांकडून हक्क हिसकावून घेत असल्याचंही ते म्हणाले आहेत.