रॅम्प वॉक ते राजभवन : बॉलिवूडला सजवणारी डिझायनर अग्निमित्रा पॉल होणार बंगालच्या उपमुख्यमंत्री

Agnimitra Paul ग्लॅमरस दुनियेतून आलेल्या अग्निमित्रा राजकारणाच्या धकाधकीत टिकतील का? असा प्रश्न विचारला जात होता. पण...

रॅम्प वॉक ते राजभवन : बॉलिवूडला सजवणारी डिझायनर होणार बंगालची मुख्यमंत्री?

रॅम्प वॉक ते राजभवन : बॉलिवूडला सजवणारी डिझायनर होणार बंगालची मुख्यमंत्री?

”मी कपडे डिझाइन करायचे सोडून आता बंगालचे नशीब डिझाइन करायला आले आहे,” असे  नेहमी म्हणणाऱ्या आणि एकेकाळी रॅम्पवर मॉडेल्सना चालवणाऱ्या अग्निमित्रा पॉल राजभवनावर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पश्चिम बंगालच्या राजकारणात मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या अखेर अमित शाह यांनी सुवेंदू अधिकारी यांचे नाव मुख्यमंत्रपदासाठी तर, पॉल आणि निसिथ प्रमाणिक यांचे नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करण्यात आले आहे. फॅशन जगतातील ग्लॅमर सोडून राजकारणाच्या रंणांगणात उतरलेल्या अग्निमित्रा यांनी केवळ स्वतःला सिद्धच केले नाही, तर आज त्यांचे बंगालच्या उपमुख्यमंत्री पदासाठी नाव घोषित झाले आहे. अग्निमित्रा पॉल यांचा हा थक्क करणारा प्रवास नेमका कसा आहे? जाणून घेऊया…

तामिळनाडूतील काँग्रेसचा ‘टीव्हीके’ला पाठिंबा म्हणजे ‘दिल्ली पॅटर्न’ची पुनरावृत्ती; धोका नेमका काय?

अग्निमित्रा पॉल एकेकाळी बॉलिवूडच्या सुपरस्टार्सना आपल्या डिझाईन्सने सजवणारी ही फॅशन डिझायनर आज बंगालच्या राजकारणातली भाजपची ‘फायर ब्रँड’ नेत्या म्हणून समोर आल्या आहेत. पॉल यांचा राजकारणात येण्यापूर्वीचा प्रवास अतिशय दिमाखदार होता. त्या कोलकात्यातील एक प्रख्यात फॅशन डिझायनर होत्या. त्यांनी श्रीदेवी, मिथुन चक्रवर्ती, ईशा देओल आणि सोनाली कुलकर्णी यांसारख्या दिग्गज कलाकारांचे कपडे डिझाईन केले आहेत. त्याशिवाय अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांना भेट देण्यात आलेली शाल आणि ब्लँकेट सुद्धा अग्निमित्रा यांनीच डिझाईन केलेली होती. फॅशन जगतात त्यांनी ‘Inga’ नावाने स्वतःचा ब्रँड उभा केला आणि देशभर नाव कमावले.

‘फायर ब्रँड’ नेत्या ही ओळख कशी मिळाली?

2019 मध्ये अग्निमित्रा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सर्वांनाच धक्का दिला. ग्लॅमरस दुनियेतून आलेल्या अग्निमित्रा राजकारणाच्या धकाधकीत टिकतील का? असा प्रश्न विचारला जात होता. पण त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सर्वांची तोंडे बंद केली. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी ‘उमा’ नावाचा उपक्रम राबवून महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. निवडणुकीच्या काळात त्यांच्या गाडीवर हल्ले झाले, तोडफोड झाली, पण त्या डगमगल्या नाहीत. अगदी हेल्मेट घालून त्यांनी आपला प्रचार सुरू ठेवला आणि विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. त्यांच्या याच आक्रमक स्वभावामुळे त्यांना भाजपच्या ‘फायर ब्रँड’ नेत्या मानले जाते.

कुणी धुणी-भांडी करणारं तर, कुणी शेतकऱ्याचं पोर; बंगालमध्ये कोण कोण आमदार झालं?

2026 च्या निवडणुकीत अग्निमित्रा पॉल यांनी आउसग्राम किंवा आसनसोल दक्षिण भागातून मोठी मते मिळवत आपला दबदबा सिद्ध केला. भाजपला बंगालमध्ये मिळालेल्या ऐतिहासिक विजयामागे महिला मतदारांची मोठी साथ आहे आणि त्याचे श्रेय अग्निमित्रा यांच्यासारख्या नेत्यांना जाते.

Exit mobile version