West Bengal Violence: हिंसाचारप्रकरणी उच्च न्यायालयाने बंगाल पोलिसांना फटकारले, 5 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश

West Bengal Violence: पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटनांबाबत कलकत्ता उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. याशिवाय 5 एप्रिलपर्यंत सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ सादर करण्याचे निर्देशही सरन्यायाधीशांनी दिले आहेत. हिंसाचाराच्या घटनांबाबत उच्च न्यायालयानेही पोलिसांना फटकारले आहे. त्यावर नियंत्रण का ठेवता आले नाही, कारण मिरवणूक त्यांच्या परवानगीनेच निघाली होती, असे न्यायालयाने म्हटले आहे. शुभेंदू अधिकारी यांनी याचिका […]

WhatsApp Image 2023 04 03 At 4.05.24 PM

WhatsApp Image 2023 04 03 At 4.05.24 PM

West Bengal Violence: पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटनांबाबत कलकत्ता उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. याशिवाय 5 एप्रिलपर्यंत सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ सादर करण्याचे निर्देशही सरन्यायाधीशांनी दिले आहेत. हिंसाचाराच्या घटनांबाबत उच्च न्यायालयानेही पोलिसांना फटकारले आहे. त्यावर नियंत्रण का ठेवता आले नाही, कारण मिरवणूक त्यांच्या परवानगीनेच निघाली होती, असे न्यायालयाने म्हटले आहे.

शुभेंदू अधिकारी यांनी याचिका दाखल केली

राज्यात रामनवमीच्या दिवशी हावडा आणि हुगळीत मिरवणुकीदरम्यान हिंसाचार झाला होता. विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी या हिंसाचाराची एनआयए चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल केली होती. हिंसाचाराच्या वेळी बॉम्ब फेकण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यांनी या भागात केंद्रीय दले तैनात करण्याची मागणी केली आहे.

‘गुजरातमध्ये लोकशाही नव्हे, हिटलरशाही’; पटोलेंची टीका 

अहवाल दाखल करण्याचा आदेश

त्याचवेळी महाधिवक्ता एसएन मुखर्जी यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. शिवपूरमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. हावडा शहराला लागून असलेल्या बाधित भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय पावले उचलली आहेत, याचा सर्वंकष अहवाल 5 एप्रिलपर्यंत दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हुगळीत हिंसाचार उसळला

हुगळीत रामनवमीच्या रॅलीदरम्यान हा हल्ला झाल्याचा आरोप भाजप नेत्याने केला आहे. या हल्ल्यात स्थानिक आमदार जखमी झाल्याचा दावा केला जात आहे. परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. इंटरनेटही बंद झाले आहे.

 

Exit mobile version