Download App

अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला! ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव का ठेवलं? जाणून घ्या सविस्तर…

What Is Operation Sindoor Pahalgam Attack Revenge : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) सुरू केले. या कारवाईअंतर्गत, भारताच्या तिन्ही सैन्याने संयुक्त कारवाईअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त ( India Pakistan Tension) काश्मीर (पीओके) मध्ये असलेल्या एकूण 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले (Pahalgam Attack Revenge) केले. परंतु या ऑपरेशनचं नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ असं का ठेवण्यात आलंय, ते जाणून घेऊ या.

पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना हिंदूंना लक्ष्य केलं होतं. पुरूषांना टार्गेट करून मारण्यात आलं, यामध्ये अनेक महिला विधवा झाल्या. त्यांच्या पतींना त्यांच्यासमोरचं गोळ्या घालून त्यांना निवडकपणे मारण्यात आले. एका नवविवाहित महिलेच्या पतीला तिच्या समोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. दहशतवाद्यांनी त्या महिलेला सांगितले की, जाऊन मोदींना हे सांग. या हल्ल्याबद्दल संपूर्ण देशात संतापाचे वातावरण होते.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 90 दहशतवाद्यांचा खात्मा, पाकिस्तानचे 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यांनी म्हटलं होतं की, दहशतवाद्यांच्या आकाला योग्य उत्तर देण्यात येईल. आज भारताने पाकिस्तानमध्ये नऊ ठिकाणांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी स्वतः या ऑपरेशनला ‘सिंदूर’ असे नाव दिले. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर त्यांची हत्या केली. सिंदूर हिंदू धर्माशी देखील संबंधित आहे. दहशतवाद्यांनी महिलांचे सिंदूर नष्ट केले होते, म्हणून या ऑपरेशनला सिंदूर असे नाव देण्यात आले, अशी माहिती मिळतेय.

भारताकडून ऑपरेशन सिंदूर! पहलगाम हल्ल्याचा बदला, शंभर किलोमीटर आतमध्ये घुसून मारलं

ऑपरेशन सिंदूर नाव वाचून डोळ्यात पाणी आलं. मोदींना आमच्या यातना कळाल्या. त्या भ्याड दहशतवाद्यांना धडा शिकवलाच पाहिजे, अशी प्रतिक्रिया संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी दिली आहे. तर त्यांची मुलगी आसावरी जगदाळेने म्हटलंय की, माझ्या वडिलांना आज खऱ्या अर्थाने सरकारकडून श्रद्धांजली मिळाली. सरकारने 15 दिवसात मिशन पूर्ण केलंय. सरकारचे आभार.

ऑपरेशन सिंदूर अत्यंत समर्पक नाव आहे. दहशतवादी म्हणाले होते, मोदीला जाऊन सांगा की आम्ही काय केलंय, त्याला आता मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आता पाकिस्तानला चांगला धडा मिळाला आहे, असं पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेले कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे यांनी म्हटलंय.

 

follow us