CBSC Exam : ‘ऑन-स्क्रीन मार्किंग सिस्टम’ ने उत्तरपत्रिकांची होणार चेकिंग; नेमका फायदा कुणाला?

CBSC Board Exam CBSC Board Exam केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बोर्ड परीक्षा काही दिवसांत सुरू होणार आहेत. त्याआधी बोर्डाने एक मोठी घोषणा केली आहे.

CBSC Exam : 'ऑन-स्क्रीन मार्किंग सिस्टम' ने उत्तरपत्रिकांची होणार चेकिंग; नेमका फायदा कुणाला?

CBSC Exam : 'ऑन-स्क्रीन मार्किंग सिस्टम' ने उत्तरपत्रिकांची होणार चेकिंग; नेमका फायदा कुणाला?

CBSC Board Exam Answer Sheet Checked By Digital Screen Marking System : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) बोर्ड परीक्षा काही दिवसांत सुरू होणार आहेत. मात्र, त्याआधी बोर्डाने एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार बारावी परिक्षांचे उत्तरपत्रिका डिजिटल स्क्रीन मार्किंग (OSM) सिस्टिमने तपासल्या जाणार आहे. नेमकी ऑन स्क्रिन मार्किंग सिस्टम काय आहे? त्याबद्दल जाणून घेऊया…

भरपेट जेवणाचं टेन्शनचं मिटलं ना राव! लग्नातलं जेवण अन् जोरदार ढेकर; ‘BuffetGPT’ नेमकं काय?

डिजिटल स्क्रीन मार्किंग (OSM) म्हणजे काय?

डिजिटल स्क्रीन मार्किंग ही उत्तरपत्रिका डिजिटल पद्धतीने तपासण्याची एक पद्धत आहे. पूर्वी शिक्षकांना उत्तरपत्रिकांचे बंडल तपासण्यासाठी दिले जात होते, परंतु आता त्यांना डिजिटल उत्तरपत्रिका मिळतील, ज्या टॅबलेट किंवा लॅपटॉपवर तपासल्या जातील. परीक्षेनंतर, उत्तरपत्रिका स्कॅन केल्या जातील आणि डिजिटल पद्धतीने शिक्षकांना दिल्या जातील. त्यानंतर शिक्षक डिजिटल पेन वापरून गुण देतील, ज्यामुळे गुणांची आपोआप गणना होईल. पूर्वी, शिक्षकांना ते मॅन्युअली मोजावे लागत होते आणि लिहून ठेवावे लागत होते. मात्र, आता यात बदल करण्यात आला असून, नव्या मार्किंग सिस्टिममुळेगुण देताना त्रुटी येण्याची शक्यता कमी होईल.

काय फायदा होईल?

कोणत्याही विषयातील एकूण गुणांमध्ये कमी चुका असतील.
उत्तरपत्रिका फाटण्याची, ओली होण्याची किंवा हरवण्याची भीती राहणार नाही.
निकाल तयार करण्यासाठी कमी वेळ लागेल आणि उत्तरपत्रिका जलद तपासल्या जातील.
उत्तर पत्रिका पुन्हा तपासणे देखील खूप सोपे होईल.

काय सांगता! UPI पेंमेंटसह मोबाईलचे सर्व काम करणार ‘हे’ ग्लासेस; जाणून घ्या फीचर्स

डिजिटल स्क्रीन मार्किंगसाठी शाळांना सूचना

सीबीएसईने बोर्ड परीक्षांसाठी डिजिटल स्क्रीन मार्किंगबाबत शाळांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये सार्वजनिक स्थिर आयपी पत्त्यांसह सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, 2 एमबीपीएस इंटरनेट स्पीड, किमान 4 जीबी रॅम आणि 1 जीबी मोफत स्टोरेज असलेले लॅपटॉप आणि संगणक समाविष्ट आहेत. शिवाय, संगणकांमध्ये अ‍ॅडोब रीडर असणे आवश्यक आहे.

परिक्षांची तारीख कधी?

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा 17 फेब्रुवारीपासून सुरू होत असून, दहावीच्या बोर्ड परीक्षा 11 मार्चपर्यंत तर, बारावीच्या बोर्ड परीक्षा 10 एप्रिल रोजी संपणार आहेत. यावेळी, दहावीच्या विद्यार्थ्यांना दोनदा बोर्ड परीक्षा देण्याची संधी असेल, ज्यामुळे त्यांना त्यांचे गुण सुधारता येतील.

Exit mobile version