Download App

विकासासाठी मोदी पैसा आणतात कुठून? खुद्द पंतप्रधानांनीच सांगितलं…

पंतपधान नरेंद्र मोदी विकासासाठी एवढे पैसे आणतात कुठून? अनेकांना नेहमीच हा प्रश्न पडलेला असतो, याच गुपित खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. राजस्थानातील एका सभेत संबोधित करताना नरेंद्र मोदींनी स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान, काँग्रेसने कधीही पैशांचा विकासकामांसाठी वापर केला नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाड्या आवळणार; BJP सहकाराचेच हत्यार वापरणार !

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील अनेकांना विकासकामांसाठी मी पैसे आणतो कुठून हा प्रश्न पडलेला असतो. देशातील चारही दिशांमध्ये मोठमोठी विकासकामे सुरु आहेत. पण आज मी पैसे कुठून आणतो हे स्पष्ट करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

पडळकरांनी मागणी केली अन् शासन निर्णयच धडकला; बारामती मेडिकल कॉलेजचे नाव…

आपल्या देशात विकासकामांसाठी पैशांची कमी कधीही नव्हती. जो पैसा सरकार पाठवेल तो पुर्णपणे विकासकामात लागायला हवा. पण काँग्रेसनं आपल्या शासन काळात देशाचं रक्त शोषणारी अशी भ्रष्ट व्यवस्था बनवली होती जी देशाच्या विकासाला खात असल्याचं मोदी म्हणाले आहेत.

जर काँग्रेस सरकारनं 1 रुपया पाठवला तर त्यातील 100 पैशांपैकी 85 पैशांचा भ्रष्टाचार होत होता. काँग्रेस प्रत्येक योजनेत 85 टक्के कमिशन खाणारा पक्ष आहे पण भाजपनं काँग्रेसची लुटणारे मार्गच बंद केले आहेत. मागील 9 वर्षात भाजप सरकारनं आधुनिक हायवे आणि रेल्वेवर 24 लाख कोटी रुपये खर्च केले असल्याचं मोदींनी स्पष्ट केलंय.

Tags

follow us