Ujjwala Yojana : देशात वाढणाऱ्या महागाईत मोदी सरकारने मोठा निर्णय घेत प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानित गॅस सिलिंडरर्सची संख्या 9 वरुन 4 वर आणली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर विरोधक मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. तर दुसरीकडे या निर्णयाचा उद्देश गरीब कुटुंबांना मिळणारा आधार कमी करणे हा नसून सिस्टिममधील त्रुटींचा गैरफायदा घेणाऱ्या लोकांवर कारवाई करणे हा असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
व्यावसायिक वापर आणि काळा बाजार रोखणे
उज्वला योजने (Ujjwala Yojana) अंतर्गत अनुदानित सिलिंडरचा होणारा संभाव्य काळा बाजार आणि गैरवापर रोखणे हे या निर्णयामागचे मुख्य कारण असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार काही व्यक्ती लाभार्थ्यांच्या नावे वारंवार अनुदानित सिलिंडर्स घेत होत्या आणि ते व्यावसायिकांना चढ्या दराने विकत होत्या किंवा इतर कारणांसाठी वापरत होत्या. अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचा दावा करण्यात येत आहे.
आकडेवारीवर आधारित कोटा निश्चित
तर दुसरीकडे सरकारच्या आकडेवारीनुसार, उज्वला योजनेत समाविष्ट असलेल्या बहुतांश गरीब कुटुंबांचा वार्षिक गॅस वापर सरासरी केवळ चार सिलेंडर इतकाच असतो. सिलिंडरच्या संख्येवर घातलेली ही नवीन मर्यादा लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष वापरा इतकीच असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
भारतीय संघ कसोटी मालिका कधी खेळणार? अफगाणिस्ताननंतर ‘या’ संघाशी भिडणार टीम इंडिया –
सिलिंडर खरेदीवर कोणतीही मर्यादा नाही
या निर्णयानंतर सरकारकडून सांगण्यात आले आहे की, लाभार्थी एका वर्षात किती सिंलडर्स खरेदी करु शकतात यावर कोणतीही बंदी नाही. कुटुंबे त्यांच्या गरजेनुसार कितीही सिलिंडर्स खरेदी करु शकतात. फक्त अनुदानाचा लाभ पहिल्या चार सिलिंडरवर भेटणार आहे.
