Download App

डोनाल्ड ट्रम्प यांची डिनर डिप्लोमॅसी; पाकच्या असीम मुनीरशी जवळीक अन् नोबेल वर डोळा….

Donald Trump invite Asim Munir to White House : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि पाकिस्तानचे (Pakistan) लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांची बुधवारी भेट झाली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये जेवणासाठी आमंत्रित केले होते. भारतासह संपूर्ण जग मुनीर आणि ट्रम्प यांच्यातील जेवणाकडे लक्ष लागले ( Donald Trump invite Asim Munir) होते. भारतासंबंधू प्रश्न उपस्थित केले जात होते.आपल्याशी चांगले संबंध असलेले ट्रम्प शत्रू देशाच्या लष्करप्रमुखांना इतके महत्त्व का देत आहेत? दोघांमधील भेटीनंतर या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे. मुनीर यांना जेवणासाठी का आमंत्रित केलं होतं? हे व्हाईट हाऊसने आता स्पष्ट केलंय.

व्हाईट हाऊसने म्हटलंय की, ट्रम्प यांचे जनरल असीम मुनीर यांच्यासोबतचे जेवण नियोजित होते. कारण त्यांनी (मुनीर) ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध रोखल्याबद्दल नोबेल शांतता पुरस्कार देण्याची विनंती केली होती.

ट्रम्प काय म्हणाले?

या बैठकीबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मी त्यांना येथे बोलावले कारण मी युद्ध न करण्याबद्दल आणि ते संपवण्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो. पंतप्रधान मोदी काही काळापूर्वी येथून निघून गेले आहेत. आम्ही भारत आणि पाकिस्तानसोबत व्यापार करारावर काम करत आहोत. मला खूप आनंद आहे. दोन अतिशय शहाण्या लोकांनी युद्ध सुरू न ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या दोन मोठ्या अणुशक्ती आहेत. आज त्यांना भेटून मला सन्मान वाटला. मोदी एक अद्भुत व्यक्ती आहेत. मी त्यांच्याशी बोललो. आम्ही पंतप्रधान मोदींसोबत व्यापार करार करणार आहोत. मी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील युद्ध थांबवले. असिम मुनीर यांनी पाकिस्तानच्या बाजूने आणि पंतप्रधान मोदींनी भारताच्या बाजूने खूप प्रभावी भूमिका बजावली. दोन्ही अणुसंपन्न देश आहेत. मी दोन प्रमुख अणुसंपन्न राष्ट्रांमधील युद्ध थांबवले.

मंत्री गोगावलेंचा ‘अघोरी’प्रताप, राऊतांनी केली CM फडणवीसांची कानउघडणी…’खुर्चीखाली वाकून पाहा’

एक मोठा संकेत

मुनीर यांना देण्यात आलेले आमंत्रण हे वॉशिंग्टनकडून पाकिस्तानी लष्करप्रमुखांना मिळालेला एक मोठा संकेत मानला जात होता. अयुब खान, झिया उल-हक आणि परवेझ मुशर्रफ यांसारख्या पाकिस्तानी लष्करप्रमुखांना अशा आमंत्रणांची अनेक उदाहरणे आहेत, परंतु ते राष्ट्रपती पदावरही होते. गेल्या महिन्यात पाकिस्तान सरकारने मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती दिली होती. 1959 मध्ये अयुब खान यांच्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या लष्करी अधिकाऱ्याला हा दर्जा देण्यात आला आहे.

पाकिस्तानी माध्यमांनुसार, मुनीर यांनी त्यांच्या अमेरिका भेटीदरम्यान पाकिस्तानला एका सुसंस्कृत राष्ट्रासारखे वागवण्याचे आवाहन केले. परिस्थिती नियंत्रित करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांनाही त्यांनी पाठिंबा दिला. मुनीर म्हणाले, आम्हाला हे युद्ध त्वरित संपवायचे आहे.

अतिवृष्टीचा इशारा! कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली, रायगडमध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी

पहलगाम हल्ला

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शिगेला पोहोचला. दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 6 ते 7 मे च्या रात्री पाकिस्तान आणि पीओकेमधील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. दहशतवादाविरुद्धच्या कारवाईमुळे पाकिस्तान संतापला. त्याने ड्रोनने भारतावर हल्ला करण्यास सुरुवात केली. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचा ड्रोन पाडला. पाकिस्तानच्या या नापाक कृत्यानंतर, भारताने पुन्हा हल्ला केला. त्यांच्या अनेक हवाई तळांचे नुकसान केले. भारताच्या जोरदार हल्ल्यामुळे पाकिस्तान हादरला, दयेची याचना करण्यासाठी अमेरिकेत गेला. यानंतर, पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओशी बोलून शांततेचे आवाहन केले.

 

follow us