Download App

राजस्थानच्या राजकारणात CM शिंदेंची एन्ट्री; भाजपसाठी आव्हान की काँग्रेसची वाट बिकट होणार?

20 जून 2022. एक वर्ष, तीन महिन्यांच्या काळात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले, राज्याची सत्ता मिळविली, मुख्यमंत्रीपद मिळविले, शिवसेना पक्ष मिळविला. महाराष्ट्रात या सर्व प्रमुख गोष्टींच्या प्राप्तीनंतर आता शिंदे यांनी महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार सुरु करण्याची हालचाल सुरु केली आहे. यासाठी त्यांनी आपलं टार्गेट निवडलं राजस्थान आणि शिलेदार मिळविला राजेंद्र गुढा. (Why is Shiv Sena planning to contest assembly elections in Rajasthan)

राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. अशात भाजप आणि काँग्रेसच्या सुरु असलेल्या संघर्षात राजस्थानमध्ये आता शिवसेनेचीह एन्ट्री झाली आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेना आता राजस्थानमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

PM मोदींना CM शिंदेंचे अनोखे गिफ्ट; वयाच्या ’73’ आकड्याचा वापर करुन ‘नमो 11’ योजनेची घोषणा

जस्थानमध्ये शिवसेना प्रवेशाबरोबरच गेहलोत सरकारमधून बडतर्फ करण्यात आलेल्या राजेंद्र सिंह गुढा यांनी पक्षात प्रवेश केला. लाल डायरी दाखवून रातोरात राजकारणात प्रसिद्धीच्या झोतात आलेले माजी मंत्री राजेंद्र गुडा यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. त्यानंतर त्यांना शिवसेनेत समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

गुढा यांच्या सारखा ताकदवान नेता पक्षात आल्याने शिवसेनेची ताकदही वाढली असल्याचे बोलले जात आहे. एकेकाळी अशोक गेहलोत यांच्या निकटवर्तीय असलेल्या गुढा यांनी त्यांना मुख्यमंत्री करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. माझा आशीर्वाद नसता तर गेहलोत कधीच मुख्यमंत्री होऊ शकले नसते, असा दावाही गुढा यांनी नुकताच केला होता.

पण, शिवसेना राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक का लढवण्याचा विचार करत आहे? आणि आता त्यांच्या पक्षाचा राज्यातील विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल आणि शिवसेनेची भूमिका काय असेल? या गोष्टी पाहणे महत्वाचे ठरते.

शिवसेना राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार का करत आहे?

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवत 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. त्यावेळी महाराष्ट्रात मराठी माणसाची लोकसंख्या 43 टक्के होती, पण चित्रपट उद्योग, व्यवसाय आणि नोकऱ्यांमध्ये ही संख्या सर्वात कमी होती. गुजराती भाषिकांची लोकसंख्या 14 टक्के असूनही बहुसंख्य व्यवसायात ते होते. तर 9 टक्के लोकसंख्या असलेल्या दक्षिण भारतीयांचे छोट्या व्यवसायांवर वर्चस्व होते. या सर्वांमुळे मराठी माणसांच्या नोकऱ्या गुजराती आणि दक्षिण भारतीयांना मिळत असल्याचं म्हणत बाळासाहेब ठाकरे मैदानात उतरले आणि सुरु झाली मराठी माणसांना नोकरी देण्याची मोहीम.

संसदेचे अधिवेशन लहान असले तरी ऐतिहासिक असेल : PM मोदींचं सूचक विधान

पण हळूहळू मराठी माणसाच्या अस्मितेसोबतच शिवसेनेने कट्टर हिंदू म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्यास सुरुवात केली. निवडणुकीच्या राजकारणात उतरत सत्तेच्या दिशेने वाटचाल करायाला सुरुवात केली. 1989 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने पहिल्यांदाच युती करून निवडणूक लढवली. भारतीय जनता पक्षासोबत त्यांचे चार उमेदवार विजयी होऊन संसदेत पोहोचले. ज्या वेळी शिवसेना हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम करत होती, त्यावेळी हा मुद्दा शिगेला पोहोचला होता, त्यामुळे आपल्या या प्रतिमेचा शिवसेनेला फायदा होईल, असे पक्षाला वाटत होते.

पण पक्षाचा हा दावा फोल ठरला आणि शिवसेना महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली. महाराष्ट्राबाहेर एकही जागा जिंकणे शिवसेनेला कठीण झाले आहे. शिवसेनेने उत्तरप्रदेशमध्ये 1991 मध्ये विधानसभेची एक जागा जिंकली होती. त्यानंतर थेट 2021 साली शिवसेनेला पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेरील दादरा आणि नगर हवेलीतून खासदार मिळाला. आता पक्ष ताब्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांना इतर राज्यातही शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून शिवसेनेने राजस्थानमधून पक्षाचा विस्तार सुरू केला आहे.

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना म्हटले की, ‘आम्ही आमचा पक्ष महाराष्ट्राबाहेर वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्ही राजस्थानमधून प्रचाराची सुरुवात केली आहे. पुढे त्या म्हणाल्या की, आधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासोबत असलेले 10 राज्य युनिटचे प्रमुख सध्या आमच्या पक्षात सामील झाले आहेत. पण राजस्थानमध्ये पक्ष केव्हा आणि कशी निवडणूक लढवणार हे मुख्यमंत्री शिंदेच ठरवतील, असेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

शिवसेना भाजपसोबत युती करणार का?

राजस्थानमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश झाल्याने आगामी लोकसभा. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपसोबत युती करून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, सध्या तरी दोन्ही पक्षांकडून युती करण्याबाबत कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.

मात्र राज्याच्या राजकारणात शिवसेनेच्या प्रवेशानंतर अनेक समीकरणे नव्याने तयार झाली आहेत आणि अनेक समीकरणेही बिघडू लागली आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शिवसेनेने निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षासोबत युती करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास पक्ष किमान 5 ते 10 जागांवर आपले उमेदवार उभे करेल, असा अंदाज आहे.

पत्रकार परिषदेत शिंदे काय म्हणाले?

गुढा यांच्या शिवसेना प्रवेशावेळी आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि गुढा यांनी राजस्थानमधील शिवसेनेच्या भूमिकेवर काहीही बोलले नाही. मात्र, आपला पक्ष जनतेसाठी काम करतो, पक्ष सत्तेवर आल्यास राज्याचा विकास, महिलांची सुरक्षा, भक्कम कायदा व सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांची प्रगती लक्षात घेऊन या भागातील तरुणांना व उद्योगांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम करेल, असे त्यांनी सांगितले. राजेंद्र गुढा हे राज्यातील जनतेसाठी आवाज उठवत होते. त्यांची चूक होती का? गुढा यांनी मंत्रीपद सोडले, पण सत्य सोडले नाही.

याच पत्रकार परिषदेत शिंदे यांनी राजेंद्र गुढा यांचे कौतुक करत, देशाला तुमच्यासारख्या खऱ्या नेत्याची गरज आहे, जो स्वार्थ बाजूला ठेवून जनतेचे हित पाहतो. ज्याप्रमाणे तुम्ही मंत्रीपद सोडले होते, त्याचप्रमाणे वर्षभरापूर्वी मी आणि माझ्यासह 9 मंत्र्यांनी मंत्रीपद सोडले होते, आम्ही सत्यासाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठी सत्ता सोडली होती, असेही पुन्हा एकदा सांगितले.

Tags

follow us

वेब स्टोरीज