Download App

हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण; पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर नागेश यांनी घेतला मोठा निर्णय

धाराशिव 'नादच करती काय? यायलाच लागतंय' या संवादामुळे समाज माध्यमावर प्रसिद्ध झालेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण

  • Written By: Last Updated:

Hotel Bhagyashree : धाराशिव ‘नादच करती काय? यायलाच लागतंय’ या संवादामुळे (Bhagyashree) समाज माध्यमावर प्रसिद्ध झालेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण प्रकरणी अखेर तीन दिवसानंतर धाराशिव शहर पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात डोक्याला बंदूक लावून धमकावत अपहरण करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हाँटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांना 23 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजता अपहरण करुन मारहाण केली होती. धाराशिव शहर पोलीस स्टेशनला तक्रार देऊन गुन्हा दाखल होत नव्हता. पोलीस अधिक्षक रितू खोकर यांना नागेश मडके भेटल्यानंतर आज धाराशिव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात अपहरणकर्त्याविरूद्ध गुन्हा दाखल झालाय.

खळबळजनक! हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं दिवसाढवळ्या अपहरण, बेदम मारहाण करत पुलावरून फेकून दिलं

नागेश मडके हा बंदुकीसाठी बनाव करतोय, असा पोलीसांना संशय होता त्यामुळे गुन्हा दाखल पोलीस करत नव्हते. शेवटी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा आत्मदहनाचा इशारा दिला होता.

10 जुलै रोजी नागेश मडके यांना अज्ञात व्यक्तीने फोनवरून जिवे मारण्याची धमकी दिली होती. 13 दिवसानंतर नागेश मडके यांचे अपहरण करुन मारहाण करण्यात आली होती धमकी दिल्यावरच पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं होतं असं सांगत मी आता श्रावण महिना असल्याने बोकडाचा नॉनव्हेज मटन न देता शुद्ध शाकाहारी जेवण विकणार असल्याचा निर्णय भाग्यश्री वाल्याने जाहीर केला आहे.

follow us