Download App

“महाराष्ट्राच्या मनात काय ते तुम्हाला दिसेलच”, उद्धव-राज भेटीवर फडणवीसांचा इलेक्शन अजेंडा

महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल असं आव्हानही दिलं.

Devendra Fadnavis on Uddhav and Raj Thackeray :  राज्याच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) मातोश्रीत जाऊन उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही बंधू पुन्हा एकत्र आल्याचे चित्र राज्याने पाहिलं. उद्धव ठाकरेंनी सांगितलं की राज ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित झाला. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या मनातलं घडलं अशी चर्चा सुरू झाली. यानंतर प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना याच मुद्द्यावर विचारलं. त्यावर फडणवीसांनी ठाकरेंना शुभेच्छा तर दिल्याच पण महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल असं आव्हानही दिलं.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज मातोश्री येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याबाबत विचारले असता उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले चांगली गोष्ट आहे यात राजकारण कशासाठी पहायचं आपण. आमच्याही उद्धवजींना शुभेच्छा आहेत सगळ्यांच्याच आहेत. जन्मदिनाच्या शुभेच्छा द्यायला गेले तर त्यात राजकारण पाहणं हे काही योग्य नाही असं मला वाटतं.

या शुभेच्छानंतर महाराष्ट्राच्या मनात असलेलं घडत आहे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत यावर बोलताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं. आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल. आता काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्राच्या मनातलं आहे असं म्हणणं काही योग्य नाही. फार मोठं स्टेटमेंट होईल ते असे फडणवीस म्हणाले.

रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंचा जावई अडकला; CM फडणवीस बोलले पण तोलूनमापून..

मंत्र्यांना अडचण असेल तर माझ्याशी बोला पण..

समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात वाद उफाळून आला आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही मंत्र्यांचे कान टोचले. अशा प्रकारे पत्र लिहून वाद कुणीही तयार करू नये. मंत्र्यांनी आपापसात बोलावं. त्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी मला येऊन सांगाव्यात म्हणजे त्या अडचणी आपल्याला दूर करता येतील.

मंत्री आणि राज्यमंत्री एकाच सरकारचे घटक आहेत. सगळे अधिकार मंत्र्यांकडे असतात. मंत्री जे अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात. राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही असे मानणेही योग्य नाही. राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण अशा प्रकारच्या बैठकांत काही धोरणात्मक निर्णय असतील तर ते निर्णय मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेता येत नाहीत. जर घेतले तर त्याला मंत्र्यांची मान्यता घ्यावी लागते. मंत्री आणि राज्यमंत्री दोघांनीही सामंजस्य दाखवायला पाहिजे. काही अडचण असेल तर माझ्याशी बोललं पाहिजे.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार भाजपात; मंत्री नितेश राणे यांनी केला मोठा दावा

follow us