Agniveer Amritpal Singh Death: पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील कोटली कलान गावातील 19 वर्षीय अमृतपाल सिंग अग्निवीर म्हणून सैन्यात दाखल झाले होते. ते जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे तैनात होते. 11 ऑक्टोबर रोजी त्यांच्याच रायफलने गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंग यांच्यावर त्यांच्या मूळ गावी कोटली कलान येथे शुक्रवारी (13 ऑक्टोबर) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराचे जवानही अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते. मात्र, या प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ स्थापन करण्यात आली आहे.
भारतीय लष्कराने व्यक्त केला शोक
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना भारतीय लष्कराने अग्निवीर अमृतपाल सिंग यांच्या शोकाकुल शूर कुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत.
खासगी रुग्णवाहिकेतून मृतदेह गावात पोहोचला
अमृतपाल सिंग यांचे पार्थिव त्यांच्या युनिटने खासगी रुग्णवाहिकेतून गावात आणण्यात आले होते. जवान आणि एक कनिष्ठ कमिशन्ड ऑफिसर आणि इतर 4 रँक अधिकारी रुग्णवाहिकेतून मृतदेह घेऊन गावात पोहोचले होते. लष्कराने सांगितले की, ‘सध्याच्या धोरणानुसार अग्निवीर अमृतपाल सिंग यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आलेला नाही.
रोहित शर्माने षटकारांचा इतिहास रचला, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकारांचा मानकरी
सैन्यात येण्यापूर्वी वडिलांसोबत शेती करायचे
अमृतपाल सिंग हा त्यांच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मध्यमवर्गीय कुटुंबातील अमृतपाल सिंग सैन्यात भरती होण्यापूर्वी वडिलांना शेतीत मदत करायचे. त्यांना ट्रॅक्टरची आवड होती.
World Cup 2023 : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, रोहित शर्मा, श्रेयस अय्यरची धुव्वाधार खेळी
अमृतपाल सिंगची बहीण कॅनडामध्ये राहते
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृतपाल सिंह 10 डिसेंबर 2022 रोजी भारतीय सैन्यात दाखल झाले होते. अमृतपाल सिंगची बहीण कॅनडामध्ये राहते. वडील गुरदीप सिंग सांगतात की, अमृतपालने भाचीच्या लग्नासाठी सुट्टी घेतली होती. कॅनडामध्ये राहणारी बहीण आणि अमृतपाल सिंग एकत्र घरी येणार होते.