Nurse Nimisha Priya : केरळच्या पलक्कड जिल्ह्यात राहणारी नर्स निमिषा प्रियाला येत्या 16 जुलै रोजी येमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा होणार आहे. निमिषाला वाचवण्यासाठी भारताकडून प्रयत्न करण्यात आले. (Nimisha) निमिषाकडून चुकीने बिझनेस पार्टरनची हत्या केली. तलाल अब्दो महदी हा निमिषाचा बिझनेस पार्टनर होता. पण त्याची नंतर निमिषावरच वाईट नजर पडली. त्याने तिला खूप त्रास दिला. एवढेच नव्हे तर तो रात्री त्याच्या मित्रांना बोलवायचा आणि निमिषासोबत संबंध ठेवायला सांगायचा अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
निमिषाने तलालची एक एक हकिकत समोर आणली. निमिषा ही माझी बायको आहे, असं तलाल सर्वांना सांगायचा. पण निमिषाचं आधीच लग्न झालेलं होतं. केरळमध्ये थॉमस नावाच्या व्यक्तीसोबत तिचं लग्न झालं होतं. तिला एक मुलगीही होती. 2015मध्ये यमनमध्ये अंतर्गत यादवी सुरू झाल्यानंतर तलालचा स्वभाव बदलला. तलाल आणि निमिषात वारंवार वाद व्हायचे. आमच्या क्लिनिकची सुरुवात चांगली झाली होती. महिन्याभराच्या आत आम्हाला चांगली कमाईही झाली. तलालने सुरुवातीला मदत केली. त्याने पैशाची मदत केली होती. पण जेव्हा माझी चांगली कमाई सुरू झाली तेव्हा तो प्रत्येक महिन्याला त्यात त्याचा वाटा मागायला लागला असंही समोर आलं आहे.
केरळची नर्स निमिषा प्रियाला येमेनमध्ये फाशी;ब्लड मनी म्हणजे काय?
एवढंच नाही तर त्याने क्लिनिकच्या शेअर होल्डरमध्ये स्वत:चं नाव घुसडलं होतं, त्याने त्याच काळात माझा खूपच छळ केला. क्लिनिकमधील कर्मचाऱ्यांच्या समोर तो मला मारहाण करायचा. माझ्यावर थुंकायचा. 2016मध्ये मी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याने माझा पासपोर्ट त्याच्याकडे ठेवला होता. तसेच मला त्याच्यासोबत राहण्यासाठी मजबूर करत होता. तो मद्यपान करून यायचा आणि मला मारझोड करायचा, असं तिने सांगितलं होतं. तो रात्री त्याच्या मित्रांना घरी घेऊन यायचा. मला त्यांच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा. मी स्वत:ला वाचवण्यासाठी बाहेर पळायचे असंही तीने सांगितलं आहे.
या सगळ्या प्रकरांत त्याच्यापासून वाचण्यासाठी मी एकदा यमनच्या रस्त्यावर रात्री पळाले होते. रात्री या रस्त्यावर एकही महिला नसते. पण माझा नाईलाज होता, असं तिने सांगितलं. 2017मध्ये एकदा निमिषाने त्याला बेशुद्ध होण्याचं औषध दिलं होतं. जेणेकरून पासपोर्ट शोधायला वेळ मिळावा म्हणून. पहिल्यांदाच त्याला बेशुद्ध होण्याचं औषध दिलं. पण त्याला काही झालं नाही. पण दुसऱ्यांदा बेशुद्ध होण्याच्या औषधाचा ओव्हडोस अधिक झाल्याने तलालचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी निमिषाला अटक केली. आता तिला देहदंडाची शिक्षा सुनावली आहे.