World Happiness Report 2025 : आपल्या आरोग्यावर फक्त आहाराचाच परिणाम होत नाही तर आपल्या मूडचाही (World Happiness Report 2025) यात वाटा असतो. म्हणूनच नेहमी म्हटले जाते की हॅपी राहा म्हणजे आरोग्यही चांगले राहील. आनंदी राहण्याचे जीवनात काय महत्व आहे हे समजून सांगण्यासाठी प्रत्येक वर्षी 20 मार्च रोजी World Happiness Day साजरा केला जातो.
याच निमित्ताने जगभरातील आनंदी देशांची यादी जारी करण्यात आली आहे. ही यादी तयार करण्यासाठी दयाळूपणा, दानशूरता आणि एकोप्याने राहणे या निकषांवर विविध देशांतील प्रसन्नता मोजण्यात आली आहे. यामध्ये भारताने चांगली कामगिरी केल्याचे दिसत आहे. यंदा भारताने आठ अंकांची प्रगती करत 118 वा क्रमांक मिळवला आहे. तर अमेरिका सध्या 24 व्या क्रमांकावर आहे.
मागील आठ वर्षांपासून फिनलंड हा देश जगात सर्वात आनंदी देश म्हणून ओळखला जात आहे. तर डेन्मार्क, आइसलँड आणि स्वीडन पहिल्या चार देशांत आहेत. वर्ल्ड हॅपिनेसच्या ताज्या अहवालात म्हटले आहे की भारताने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा चांगली कामगिरी केली आहे. भारताच्या क्रमवारीमध्ये आठ अंकांची सुधारणा झाली आहे. या यादीत भारताला 118 वा क्रमांक मिळाला आहे. कारण भारताने दान करण्यात 57 वी रँक मिळवली आहे.
हॅपी ‘फिनलंड’मध्ये वाढतोय उदासपणा.. संयुक्त राष्ट्रांचा हॅपीनेस रिपोर्ट किती खरा?
भारता शेजारील नेपाळ (92), पाकिस्तान (109) हे देश भारताच्या पुढे आहेत. म्हणजेच या देशांतील नागरिक भारतीय लोकांच्या तुलनेत जास्त आनंदी आहेत. पाकिस्तानात सध्या काय परिस्थिती आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे. गरिबी, बेरोजगारी, दहशतवाद, आर्थिक अस्थिरता, महागाई अशी अनेक संकटे आहेत. भारताची परिस्थिती अशी अजिबात नाही. तरी देखील यादीत पाकिस्तान भारताच्या पुढे आहे. त्यामुळे या यादीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
श्रीलंका 133 आणि बांगलादेश 134 रँकसह भारताच्या मागे आहेत. या दोन्ही देशांत सध्या प्रचंड अस्थिरता आहे. श्रीलंकेची स्थिती तुलनेने बरी आहे. पण बांग्लादेशात तर प्रचंड अस्थिरता आहे. या दोन्ही देशांत अनेक संकटे आहेत. याचा परिणाम येथील लोकांच्या दैनंदिन जीवनावर पडला आहे.
जगात आजमितीस अफगाणिस्तान सर्वात अप्रसन्न देश आहे. चीनमध्ये हॅपीनेस आठ अंकांनी कमी झाला आहे. त्यामुळे चीन या यादीत 68 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. मागील वर्षी चीनचा क्रमांक 60 होता. विशेष म्हणजे युक्रेन आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांत युद्धाची परिस्थिती आहे तरी देखील हॅपीनेसच्या बाबतीत हे देश भारताच्या पुढे आहेत. पॅलेस्टाईन 108 तर युक्रेन 111 क्रमांकावर आहे. एकूण 147 आनंदी देशांच्या यादीत पहिल्या 20 देशांत आता अमेरिका नाही असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
काय सांगता? बिहारचं बजेट जगातील 150 देशांच्या GDP पेक्षा जास्त, सविस्तरच वाचा
यंदा अमेरिकेचा 24 वा क्रमांक आहे. मागील काही वर्षांत अमेरिकेची कामगिरी ढासळली आहे. ब्रिटन 23 व्या क्रमांकावर आहे. वेलबीइंग रिसर्च सेंटर आणि ऑक्सफर्ड युनिवर्सिटी यांनी संयुक्तपणे हा रिपोर्ट तयार केला आहे. या यादीत जगातील एकूण 147 देशांचा समावेश करण्यात आला आहे. या देशांतील हॅपीनेस लोकांची संपत्ती, वाहने यांवर मोजलेली नाही तर यासाठी लोकांची मदत करण्याची प्रवृत्ती आणि एकमेकांना समजून घेत एकत्र राहण्याची सवय यांचा विचार करण्यात आला आहे.