भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे. खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर पॉक्सो आणि खेळाडूंना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. महिला खेळाडूंच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विखे-कर्डिलेंना धक्का, तनपुरेंचे उमेदवार आघाडीवर
दुसऱ्या महिला कुस्तीपटूच्या तक्रारीच्या आधारे दुसरी एफआयआर नोंदवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू केला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांन दिली आहे. खेळाडूंच्या तक्रारीवरून बृजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचं दिल्ली पोलिसांनी आजच सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.
पालघर प्रकरणाचा तपास सीबीआय करणार, राज सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती
दिल्लीतील जंतरमंतरवर महिला कुस्तीपटूंसह खेळाडू मोठ्या संख्येने जमले असून मागील सहा दिवसांपासून खेळाडूंचं आंदोलन सुरु होतं. फेडरेशन प्रमुखांविरोधात सात महिला खेळाडूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली होती.
मात्र, दिल्ली पोलिसांनी कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, याचा खुलासा अद्याप केला नसून बृजभूषण सिंह यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती कॅनॉट प्लेस पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांकडून बृजभूषण यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत एफआयआरमधील माहिती सांगण्याचं टाळण्यात आलं आहे.