रामदेव बाबा देणार 100 मुला-मुलींना संन्यास दीक्षा; योगी आदित्यनाथ राहणार उपस्थित

योग गुरु स्वामी रामदेव बाबा रामनवमीच्या दिवशी 100 लोकांना संन्यास दीक्षा देणार आहेत. यासाठी पतंजलीच्या योग पीठामध्ये बुधवारी नवीन संवत्सराच्या चैत्र नवरात्री निमित्ताने भव्य संन्यास दीक्षाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 40 महिला व 60 पुरुषांचा समावेश आहे. रामनवमीच्या दिवशी रामदेव बाबा या सर्वांना दीक्षा देणार आहेत. याचसोबत जवळपास 500 प्रबुद्ध महिला पुरुषांना स्वामी […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 23T120041.411

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 23T120041.411

योग गुरु स्वामी रामदेव बाबा रामनवमीच्या दिवशी 100 लोकांना संन्यास दीक्षा देणार आहेत. यासाठी पतंजलीच्या योग पीठामध्ये बुधवारी नवीन संवत्सराच्या चैत्र नवरात्री निमित्ताने भव्य संन्यास दीक्षाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 40 महिला व 60 पुरुषांचा समावेश आहे. रामनवमीच्या दिवशी रामदेव बाबा या सर्वांना दीक्षा देणार आहेत. याचसोबत जवळपास 500 प्रबुद्ध महिला पुरुषांना स्वामी रामदेव यांचे निकटवर्तीय बालकृष्ण ब्रम्हचारी हे दीक्षा देणार आहेत.

रामदेव बाबा यांनी यावर भाष्य केले आहे. रामनवमीच्या दिवशी चार वेदांच्या महापारायण यज्ञाची पूर्णाहूति करुन रामराज्याची प्रतिष्ठा, हिंदु राष्ट्राचा गौरव व सनातन धर्माला यगुधर्म आणि विश्वधर्मामध्ये प्रतिष्ठापित करण्यासाठी हे नवीन संन्यासी आपल्या पूर्वजांच्या संन्यास परंपरेमध्ये दीक्षित होणार आहेत. संन्यास घेतलेले हे सर्व भाऊ-बहीण अष्टाध्यायी, व्याकरण, वेद, वेदांग, उपनिषद या सर्वांमध्ये निष्णात होऊन योगधर्म, ऋषिधर्म, वेदधर्म व सनातन धर्माच्या प्रतिष्ठेसाठी संकल्पित होतील.

NIA Action : नागपूरमध्ये दोघे पाकिस्तानच्या संपर्कात, एनआयएच्या धाडीत धक्कादायक माहिती

बाबा रामदेव पुढे म्हणाले की, पतंजली योगपीठामध्ये स्त्री-पुरुष, जाती, मत, पंथ, धर्म, संप्रदाय यासर्वांना काहीही स्थान नाही आहे. हे सर्व जण संन्यास दीक्षेमध्ये दीक्षित होऊन सनातन धर्माचा ध्वज सर्व जगामध्ये फडकवतील, असे ते म्हणाले आहेत. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

‘लवकरच येणार Hindenburg Research नवा अहवाल! नेमका काय होणार धमाका? सर्वांनाच उत्सुकता

पुढील वर्षी जानेवारीमध्ये राम मंदिराचे उद्घाटन होणार असून जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ते म्हणाले की, दोन मोठी कामे अद्याप व्हायची आहेत, एक म्हणजे समान नागरी संहिता लागू करणे आणि दुसरे म्हणजे लोकसंख्या नियंत्रण कायदा करणे. ही दोन्ही कामे पुढील वर्षी 2024 पर्यंत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

Exit mobile version