Download App

YouTube Down : यूट्यूब डाऊन झाल्याने नेटीझन्स संतापले; ट्विटरवर व्यक्त केला संताप

YouTube Down :  व्हिडीओ स्ट्रिमींग प्लॅटफॉर्म यूट्यूबला आज मंगळवारी अडचण येत आहे. यूट्यूबला जागतिक पातळीवर आउटेजचा सामना करावा लागतोय असे डाऊनडिटेक्टरने सांगितले आहे. यूट्यूबच्या हजारो यूजर्सना यूट्यूब वापरताना अडचण येत असल्याचे  आउटेज ट्रॅकिंग वेबसाईटने ट्रॅक केले आहे.

यूट्यूब प्लॅटफॉर्म लोड होत नसल्याची तक्रार यूजर्सने केली आहे. डाऊनडिटेक्टरच्या मते मंगळवारी सकाळी 5.30च्या सुमरास आउटेजमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. आउटेजचे कारण अद्याप समजू शकलेले नाही आणि यूट्यूबने अद्याप याबाबत विधान जारी केलेले नाही. अनेक यूजर्सने याची तक्रार यूट्यूबकडे केली आहे. त्यावर यूट्यूबने आम्हाला कळवल्याबद्दल धन्यवाद, आमचे काम सुरु आहे, असे उत्तर दिले आहे.

Downdetector नुसार, बहुतांश समस्या व्हिडीओ स्ट्रीमिंग (51 टक्के) मध्ये नोंदवण्यात आल्या होत्या, तर 31 टक्के वापरकर्त्यांना अॅप ऍक्सेस करण्यात समस्या येत होत्या. 17 टक्के लोकांनी यूट्यूबच्या वेबसाइट व्हर्जनवर समस्यांची सूचना दिली

 

 

Tags

follow us