Download App

YSSharmila : मुख्यमंत्र्यांच्या बहिणीची दबंगगिरी… थेट पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली

तेलंगणात सोमवारी रस्त्यावर नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. वायएसआर तेलंगणा पक्षाच्या नेत्या आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला यांना सोमवारी एका निदर्शनादरम्यान पोलिस कर्मचार्‍यांना मारहाण केल्यामुळे ताब्यात घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, शर्मिला पेपर लीक प्रकरणासंदर्भात आंदोलन करत होत्या. यादरम्यान, त्या भरती परीक्षेतील कथित प्रश्न लीक झाल्याची चौकशी करत असलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) कार्यालयाकडे जात होती. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. यावर त्यांनी पोलिसांशी वाद घालत एका अधिकाऱ्याला व एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली आहे.

अधिक माहिती अशी. शर्मिला यांनी SIT कार्यालयात जाण्याची घोषणा केली होती. माहिती मिळताच त्यांच्या घराबाहेर पोलिस जमा झाले. त्यांना घराबाहेर पडण्यापासून रोखण्यात आले. शर्मिला गाडीतून बाहेर जात असताना पोलिसांनी तिला अडवले. पोलीस शर्मिलाच्या वाहनाला पुढे जाण्यापासून रोखत होते.

शर्मिला धरणावर बसल्या
शर्मिलाची गाडी चालवणारा ड्रायव्हर हळू हळू वेग वाढवत होता आणि समोर पोलीस उभे राहून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होते. शर्मिलाची गाडी थांबली नाही तेव्हा डझनभर पोलीस येऊन तिच्या गाडीसमोर उभे राहिले. यामुळे संतापलेल्या वायएस शर्मिला यांचा पोलिसांशी जोरदार वाद झाला. पोलिसांच्या निषेधार्थ शर्मिला काही वेळ रस्त्यावर बसल्या.

आमदार लंकेंनी आता मनावर घेतलयं.. थेट विखेंच्या मतदारसंघातच घुसले…

महिला पोलिसाला धक्काबुक्की केली
पोलिसांशी वाद घालत असलेल्या शर्मिला यांना रस्त्यावरून उचलण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. नंतर शर्मिला यांनी पोलिसांना धक्काबुक्की करून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. त्या घराबाहेर चालल्या होत्या मात्र पोलीस तिला अडवत होते. यावेळी महिला पोलिसांनी तिचा हात पकडला असता तिने महिला पोलिसांना अनेक वेळा ढकलले आणि एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली व पुढे जाण्याचा प्रयत्न केला.

केट शर्माचे हॉट फोटो पाहिलेत का?

अचानक पोलिसाला थप्पड मारली
वायएस शर्मिला यांनी एका पोलिसाला अचानक थप्पड मारली. काही वेळाने आणखी एका पोलिसाला थप्पड मारण्यात आली. त्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वायएस शर्मिला यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना पोलिसांच्या वाहनात बसवून ज्युबली हिल्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

Tags

follow us