Download App

कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज उठून कानफाटात मारतात अन् मुख्यमंत्री गाल चोळत विधिमंडळात जातात…

मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई रोज सकाळी उठून महाराष्ट्राच्या कानफडात मारत आहेत आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाल चोळत विधानसभेत जात आहेत, अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी शिंदेंना टोला लगावला.

संजय राऊत म्हणाले, यापूर्वी महाराष्ट्राची एवढी बेअब्रू कधीही झालेली नव्हती. आत्ताचे मुख्यमंत्री सांगतात की सीमाप्रश्नासाठी आम्ही काठ्या खाल्ल्या आहेत. आता तो जोर कुठे गेला? आता जोश दाखवा ना. आता सीमाप्रश्नावर ठोस भूमिका घेणार नसाल तर मुख्यमंत्री पदावर बसण्यास तुम्ही योग्य नाही? अशी टीकाही राऊतांनी केली.

सीमावादावरून राऊतांना सरकारला टोला लगावला. ते म्हणाले, सत्तेत येताच सीमावाद पेटला हीच एकनाथ शिंदे यांची क्रांती आहे. त्यांच्या तोडांत कुणी बोळा कोंबला आहे का? दिल्लीत सीमावादावरील बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना गुंगीचे औषध टोचून पाठवले आहे. मात्र, या प्रश्नावर लोकांच्या भावना तीव्र आहेत. हे सरकारला कळत नसेल तर कठीण आहे.

नागपूर येथील भूखंड घोटाळ्यावरून राऊतांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फडणवीसांवर बोचरी टिका केली. ते म्हणाले, 110 कोटींचा नागपूर भूखंड घोठाळा निश्चित झाला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यायला हवा. यावर अजून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का? शिंदे-फडणवीसांमध्ये मांजर बोक्यांची वाटणी झालीये का? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

Tags

follow us