हे सरकार कोणाचे काही ऐकत नाही, केवळ गद्दार मंत्र्यांचे ऐकतात; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

नागपूरः नागपूरला आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी राज्यातील अनेक प्रश्नांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. हे सरकार कोणाचे काही ऐकत तर केवळ गद्दार मंत्र्यांचे ऐकतात, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केलाय. महाराष्ट्रात अनेक मुद्दे समोर येत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे. पण […]

Aditya Thackrey

Aditya Thackrey

नागपूरः नागपूरला आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी राज्यातील अनेक प्रश्नांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. हे सरकार कोणाचे काही ऐकत तर केवळ गद्दार मंत्र्यांचे ऐकतात, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केलाय.

महाराष्ट्रात अनेक मुद्दे समोर येत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे. पण घटनाबाह्य सरकार काही बोलत नाही. उद्योग महाराष्ट्र बाहेर गेले आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मी चॅलेंज केले की, माझ्यासोबत, मीडियासोबत येऊन चर्चा करावी. पण त्यावर ते बोलत नाही. मागील काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पण त्यावर ते बोलत नाही. ओला दुष्काळ असे मुद्दे आहेत. ते सभागृहात उचलू , असे आदित्य ठाकरे म्हणाले.

हे घाबरट सरकार आहे. इकडचा एकही मंत्री कर्नाटकात गेलेला नाही. हे घटनाबाह्य सरकार आहे. सरकार लवकरच कोसळेल, असा दावा ठाकरे यांनी केला आहे. नॅनोचा तरी प्रकल्प नागपुरात येऊ द्या, कर्नाटकाची निवडणूक असल्याने महाराष्ट्रातील जिल्हे तोडून कर्नाटकमध्ये न्यायचे आहेत. गुजरात निवडणूक होती. त्यावेळी उद्योग पळवून नेलेत, हे सरकार कोणाचेच काही ऐकत नाही तर केवळ गद्दार मंत्र्यांचे ऐकतात, आम्ही महाराष्ट्राचा जनतेचे ऐकून काम करू, असे ठाकरे म्हणाले.

Exit mobile version