Download App

कसब्यात एका बूथवर 1 हजार बोगस मतदान, भाजप आमदार Madhuri Misal यांचा आरोप

कसबा ( Kasaba )  आणि पिंपरी चिंचवड या दोन पोटनिवडणुकीचा प्रचार आता थांबला आहे. पण आज महाविकास आघाडीचे उमेदवर रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी भाजपवर (BJP ) पैसे वाटत असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी उपोषण देखील केले. यानंतर भाजपने हा पॉलिटिकल स्टंट असल्याची टीका केली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यानंतर भाजपच्या पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरी मिसाळ ( Madhuri Misal ) यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी जगदीश मुळीक, मुरलीधर मोहोळ हे नेते देखील उपस्थित होते.

कसबा विधानसभेमध्ये एका बूथवर जवळपास 1000 बोगस मतदान असल्याचा आरोप केला आहे. एका विशिष्ट समाजाला भर सभेत आवाहन केले गेले. त्यामुळे यावर कारवाई व्हावी अशी आमची मागणी असल्याचे माधुरी मिसाळ यांनी सांगितले. तसेच रवींद्र धंगेकर यांनी जे उपोषण केले तो एक पॉलिटिकल स्टंट आहे. त्यांनी प्रचाराची वेळ संपल्यानंतर देखील असा स्टंट करुन प्रचार केला. त्यांची जर खरी तक्रार होती तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार द्यायला पाहिजे होती, असे मिसाळ म्हणाल्या आहेत.

तसेच या प्रकारानंतर आमची मागणी आहे की, रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करावी. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. त्यांना त्यांचा पराभव दिसायला लागलेला आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यावर आरोप केला आहे. कलम 144 लागू  असताना त्यांनी गर्दी जमवत आचारसंहितेचा भंग केला आहे, असे मिसाळ म्हणाल्या आहेत.

दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवर रवींद्र धंगेकर यांनी मतदानापूर्वी भाजप पैसे वाटत असल्याचा आरोप केला आहे. यावरुन त्यांनी आज उपोषण देखील केले. यावरुन भाजपने ही तक्रार केली आहे.

 

Tags

follow us